‘यांच्या नावातच पनौती आहे.. सलग चौथा सामना गमावल्यानंतर स्मृती मानधनाचा आरसीबी सोशल मिडीयावर तहोतोय ट्रोल, लोकांनी शेअर केले भन्नाट मिम्स.
Women’s Primer League RCBW vs UPW : यूपी वॉरियर्सने आरसीबीचे 139 धावांचे आव्हान 13 षटकात बिनबाद पार केले. सलामीवीर एलिसा हेलीने 47 षटकात नाबाद 96 धाा ठोकल्या. तर तिला देविका वैद्याने नाबाद 36 धावा करत चांगली साथ दिली.
WPL 2023 च्या पहिल्याच हंगामातील आरसीबीचा हा सलग चौथा पराभव आहे. लीग स्टेजमध्ये प्रत्येक संघ आठ सामने खेळणार आहे. आसीबीने पहिले चार सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांचे प्ले ऑफमध्ये पोहचण्याचे स्वप्न जवळपास भंगल्यात जमा आहे.
View this post on Instagram
लीग स्टेजमध्ये मुंबईने तीन पैकी तीन, यूपीने तीन पैकी दोन, दिल्लीने तीन पैकी दोन तर गुजरात जायंट्सने तीन पैकी एक सामना जिंकला आहे. आरसीबीलाच चार पैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. लीगमधील पहिले तीन संघ प्ले ऑफमध्ये जाणार आहेत.
आरसीबीचे विजयासाठीचे 139 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उरतलेल्या यूपी वॉरियर्सने दणक्यात सुरूवात केली. कर्णधार एलिसा हेलीने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी केली. तर तिला देविका वैद्यने बॉल टू रन करत उपयुक्त साथ दिली. या दोघींनी पॉवर प्लेमध्येच यूपीला 55 धावांपर्यंत पोहचवले.
दरम्यान, आधीच फलंदाजीत कच खाणाऱ्या आरसीबीची गोलंदाजी देखील निष्प्रभ होत होती. याचा फायदा घेत हेलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने वैद्यही तिला चांगली साथ देत होती. या दोघांनी आपली ही भागीदारी बघता बघता शंभरपर्यंत नेली. यात हेलीचा मोठा वाटा होता.

तिने 44 चेंडूत 90 धावा ठोकल्या होत्या. यूपीच्या सलामी जोडीनेच आरसीबीचे 139 धावांचे आव्हान पार करण्याचा मनसुबा आखला होता. अखेर हा मनसुबा एलिसा हेलीने 47 चेंडूत नाबाद 96 धावा करत पार केला. देविका वैद्यने 31 चेंडूत नाबाद 36 धावा करत तिला चांगली साथ दिली.
तत्पूर्वी, वुमन्स प्रीमियर लीगच्या आठव्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सर्वबाद 138 धावा केल्या. अनुभवी एलिस पेरीने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. सलामीवीर सोफी डिवाईनने देखील 36 धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांनी फक्त खेळपट्टीवर हजेरी लावली. यूपीकडून सोफी एकलस्टोनने 4 तर दिप्ती शर्माने 3 विकेट्स घेत आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडले.