“हार्दिक पंड्याची एक चूक पडली महागात तर अर्शदीप सिंहचे नो बॉल ठरले संघासाठी धोकादायक”, या 3 कारणामुळे भारतीय संघाचा श्रीलंकेकडून झाला 16 धावांनी पराभव!
“हार्दिक पंड्याची एक चूक पडली महागात तर अर्शदीप सिंहचे नो बॉल ठरले संघासाठी धोकादायक”, या 3 कारणामुळे भारतीय संघाचा श्रीलंकेकडून झाला 16 धावांनी पराभव!
भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक 3 सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसरा सामना काल पुण्यातील MCA स्टेडियमवर खेळवला गेला. तो सामना श्रीलंकेने 16 धावांनी जिंकून मालिका 1-1 अशी खिशात घातली.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 206 धावा केल्या आणि भारताला 207 धावांचे मोठे लक्ष्य दिले. याला प्रत्युत्तर देताना भारताला केवळ 190 धावा करता आल्या आणि अवघ्या 16 धावांनी भारतीय संघाचा निसटता पराभव झाला.. भारतीय खेळाडूंनी या सामन्यात अनेक चुका केल्या ज्यामुळे संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. चला तर मग जाणून घेऊया भारताच्या पराभवाची 3 मोठी कारणे.

१) हार्दिक पांड्याचा गोलंदाजीचा निर्णय
पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला नेहमीच यश मिळते. या मैदानात प्रथम फलंदाजी करणारा संघच जिंकतो असे अनेक प्रसंगी दिसून आले आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची संधी होती. पणत्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो निर्णय टीम इंडियावर भारी पडला आणि श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई करत टीम इंडियासमोर २०७ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.
2) एकाच डावात 7 नो बॉल टाकले
भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात त्यांच्या खराब कामगिरीने सर्वांना निराश केले आहे. विशेषत: वेगवान गोलंदाजांनी खूप धावा लुटल्या आहेत आणि त्यासोबतच बरेच नो बॉलही टाकले आहेत. त्यामुळे श्रीलंकेला भारतासमोर मोठी धावसंख्या उभारता आली.
अर्शदीप सिंगने एकूण 5 नो बॉल टाकले, तर उमरान मलिक आणि शिवम मावी यांनीही 1-1 नो बॉल टाकला. भारतीय संघाच्या गोलंदाजांनी एका डावात एकूण 7 नो बॉल टाकले. जे खूपच आश्चर्यकारक आहे. भारताने या 7 नो बॉलवर 34 धावा दिल्या आहेत. विशेष म्हणजे, टीम इंडियाला दुसऱ्या टी-20 मध्ये अवघ्या 16 धावांनी पराभव पत्करावा लागला. गोलंदाजांनी शिस्तीने गोलंदाजी केली असती तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.
3) टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप होती.
तिसरे आणि महत्वाचे कारण मम्हणजे भारतीय सलामीवीर फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरले.
207 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी, संघाला आपल्या शीर्ष फळीकडून नेहमीच सर्वाधिक अपेक्षा असतात. विशेषतः सलामीवीरांकडून. सलामीच्या फलंदाजांनी वेगवान फलंदाजी सुरू केली तर येणाऱ्या फलंदाजांनाही चांगली संधी आहे. गती सेट करण्यात सलामीच्या फलंदाजांचा मोठा वाटा असतो.
पण ईशान किशन (२) आणि शुभमन गिल (५) यात पूर्णपणे अपयशी ठरले. तो लवकर आऊट झाला आणि संघाला अधिक दडपणाखाली आणले. त्याचवेळी यानंतर पदार्पण करणाऱ्या राहुल त्रिपाठीनेही 5 धावा केल्या. यासोबतच कर्णधार हार्दिक पांड्या (12) यानेही आपल्या फलंदाजीने निराश केले.
त्यामुळेच वरील सर्व कारणांमुळे भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. श्रीलंकेने हा सामना जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना उद्या राजकोट येथे खेळवला जाणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तोच संघ मालिका सुद्धा आपल्या ननावर करेल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण असणार आहे.