5 कारणे ज्यामुळे भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा एकदिवशीय सामना सुद्धा गमावू शकतो..
5 कारणे ज्यामुळे भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा एकदिवशीय सामना सुद्धा गमावू शकतो..
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघ 7 गडी राखून हरला होता. आता उभय संघांमधला दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या खेळवला जाणार आहे. आता टीम इंडियाचा दुसरा वनडे सामनाही गमावणार हे जवळपास निश्चित झाला आहे. यामागे काही मोठी कारणे आहेत, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
न्यूझीलंडचा संघ खूप मजबूत आहे.
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात फारसा अनुभव नसलेल्या युवा खेळाडूंचा भरणा आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडचा संघ भारतापेक्षा खूपच मजबूत आहे आणि पहिल्या वनडेतही ते दिसून आले.
View this post on Instagram
चांगल्या गोलंदाजांची उणीव.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला गोलंदाजी करताना खूप अडचणी आल्या. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत टीम इंडियासाठी सामना जिंकणे खूप कठीण होत आहे आणि दुसऱ्या वनडेतही भारतीय संघाची गोलंदाजी पराभवाचे कारण ठरू शकते.
क्षेत्ररक्षणातही उणिवा आहेत.
तुम्ही आशिया कप किंवा T20 विश्वचषक आणि पहिला एकदिवसीय सामना पाहा. भारतीय संघ क्षेत्ररक्षणात अनेक चुका करत असून या चुका पराभवास कारणीभूत ठरत आहेत. भारतीय संघाला आता क्षेत्ररक्षण सुधारावे लागणार आहे.

शिखर धवनकडे कर्णधारपदाचा अनुभव नाही.
शिखर धवनला अधिक सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. अशा स्थितीत नवीन संघ सांभाळणे त्याच्यासाठी आणखी कठीण होणार आहे. शिखर धवनला पहिल्या वनडेत संतुलित प्लेइंग इलेव्हनची निवड करता आली नाही. पहिल्या वनडेतील पराभवानंतर दुसऱ्या वनडेत तो प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करेल आणि पुन्हा भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागू शकते.
ही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
व्हिडीओ प्लेलीस्ट:
https://youtu.be/B1LQdUgULdU