प्रामुख्याने आपला राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे, परंतु हॉकी पेक्षा आपल्या देशात क्रिकेट ला जास्त पसंती आहे. देशातील सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे वेडे आहेत. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट चे वेड हे सर्वाधिक आहे.
भारताची लोकसंख्या ही जगात पहिल्या स्थानावर आहे आणि या सर्वांमधून अवघ्या 15 खेळाडूंना भारतीय क्रिकेट संघामध्ये खेळण्यासाठी संधी मिळते मग तुम्हीच विचार करा प्रत्येक खेळाडूंचा किती खडतर असेल हा प्रवास.
क्रिकेट मध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक खेळाडूला फॉर्म गरजेचा असतो. फॉर्म नसेल तर खेळाडूला नंतर च्या सामन्यात संधी मिळत नाहीत शिवाय त्याचे करियर सुद्धा धोक्यात येऊ शकते.
तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहे ज्याने 10 वी च्या परीक्षेमध्ये 3 वेळा नापास होऊन तसेच सरकारी नोकरीला डावलून क्रिकेट मध्ये करियर करण्याचे ठरवले.

भारतीय क्रिकेट संघाचा ऑल राऊंडर खेळाडू कृणाल पांड्या हा आहे. अत्यंत कठीण परिश्रम करून कृणाल पांड्या ने क्रिकेट मध्ये आपला जम बसवला आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना सुद्धा अथक परिश्रम करून त्याने आपले स्वप्न पूर्ण केले आहे.
एका इंटरव्ह्यू दरम्यान कृणाल पांड्या ने सांगितले की मी शाळेत असताना जास्त हुशार नव्हतो तसेच शाळा शिकण्यात काही ही इंटरेस्ट नव्हता. 10 वी ची परीक्षा 3वेळा नापास झाल्यावर सुद्धा त्यांनी हार मानली नाही. त्यानंतर कसेतरी कॉलेज सुद्धा पास केले.
त्यावेळी क्रिकेटमध्ये तो संघर्ष करत असताना कृणाल पांड्या ला सरकारी नोकरीची ऑफर सुद्धा आली होती. पण सरकारी नोकरी करण्यास नकार दिला. यामुळे आज त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. कृणाल पांड्याने सांगितले की, त्यावेळी स्पीड पोस्टमध्ये ती सरकारी नोकरी होती, मला ट्रायलसाठी पत्र मिळाले. पप्पा म्हणाले की 25 ते 30 हजार नोकऱ्या उपलब्ध होतील. त्या दिवशी माझ्या ट्रायल मॅच होत्या.
त्या ट्रायल मॅच नंतर कृणाल पांड्या चे पूर्ण आयुष्य बदलून गेले. त्याला भारतीय संघात खेळण्यासाठी जागा सुद्धा मिळाली. व क्रिकेट क्षेत्रातच आपले नाव कोरले.