क्रिकेट हा आपला राष्ट्रीय खेळ नसला तरी सर्वाधिक क्रिकेट चाहते आपल्या देशात सुद्धा आपल्याला आढळून येतात. अनेक भारतीय सुद्धा परदेशीय खेळाडूंचे खूप मोठे फॅन्स सुद्धा आहेत. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात रिकी पाँटिंग ने बनवलेल्या 5 रेकॉर्ड बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत. ही बनवलेली 5 रेकॉर्ड आजपर्यंत कोणताही खेळाडू मोडू शकला नाही.

रिकी पाँटिंग हा ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार तसेच एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. रिकी पाँटिंग च्या नावावर अनेक असे विक्रम रेकॉर्ड आहेत जे कोणीही तोडू शकणार नाही. तर जाणून घेऊया रिकी पाँटिंग चे न तोडू शकणारे हे 5 रेकॉर्ड.
1. रिकी पाँटिंगने सर्वाधिक आयसीसी ट्रॉफी जिंकल्या:-
रिकी पाँटिंग असा एकमेव कर्णधार आहे ज्याने तीनपेक्षा जास्त आयसीसी ट्रॉफी आपल्या देशासाठी जिंकल्या आहेत . ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार रिकी पाँटिंग ने चार आयसीसी ट्रॉफी जिंकल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ICC विश्वचषक 2003, ICC विश्वचषक 2007, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2006 आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2009 जिंकली.
2) सर्वाधिक क्रिकेट सामने जिंकले:-
आजपर्यंत रिकी पाँटिंग ने सर्धिक मॅचेस खेळल्या आहेत परंतु यामधून रिकी पाँटिंग ने 220 मॅचेस जिंकल्या आहेत. हा रेकॉर्ड मोडणे अत्यंत कठीण आहे.
3) वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक सामने जिंकले:-
वर्ल्ड कप हा प्रत्येकी 5 वर्षांनी असेल तरी या वर्ल्ड मधील सर्वाधिक सामने रिकी पाँटिंग ने जिंकले आहेत. रिकी पाँटिंग ने वर्ल्ड कप मध्ये एकूण 26 सामने जिंकले आहेत.
4) चॅम्पियन ट्रॉफी मद्ये सर्वाधिक वेळा विजेता:-
आयसीसी विश्वचषकाप्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रमही पाँटिंगच्या नावावर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 12 सामन्यांमध्ये तो विजयी संघाचा भाग होता.
5) कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा:-
रिकी पाँटिंग हा ऑस्त्रलिया देशाचा आक्रमक फलंदाज तसेच कर्णधार सुद्धा आहे. संघाचा कर्णधार म्हणून धावा करण्याचा विचार केला तर पॉन्टिंगचे नाव या यादीत सर्वात आघाडीवर येते. रिकी पाँटिंग हा राईट हॅण्ड खेळाडू आहे.