IPL 2023: ‘उर्वशी इथे आली नाही हे बरं झालं’, लाइव्ह मॅचमध्ये ऋषभ पंतच्या फॅननं केलं असं कृत्य, अभिनेत्री संतापली
आयपीएल २०२३ स्पर्धेत मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडलेला सामना चर्चेचा ठरला. कारण दुखापतीतून सावरत असलेला रिषभ पंत हा सामना पाहण्यासाठी आला होता.
दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील या सामन्यादरम्यान ऋषभ पंतच्या एका चाहत्याने असे कृत्य केले, ज्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला संतापली आणि तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर, या सामन्यादरम्यान एका मुलीची कृती कॅमेऱ्यात कैद झाली होती, जिच्या हातात एक फलक होता. ज्यावर लिहिले होते की, ‘थँक गॉड उर्वशी इथे नाही आली..’ मग काय, उर्वशीला ही गोष्ट आवडली नाही.
उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यादरम्यान ऋषभ पंतच्या चाहत्याचे हे कृत्य पाहून बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला भडकली आणि तिने सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत ‘का?’ असे लिहिले. उर्वशी रौतेलाच्या या पोस्टला उत्तर देताना एका चाहत्याने लिहिले, ‘ऋषभ भैया को नजर लग जाती ना.’ तर दुसऱ्या एका चाहत्याने ‘टेक इट इझी उर्वशी’ असे लिहिले.

उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू होती. मात्र काही महिन्यानंतर यांचा ब्रेकअप झाला. तेव्हापासून दोघांमध्ये ट्विटर वॉर पाहायला मिळत आहे.