“एक पाऊल पुढे, एक पाऊल मजबूत..” रिषभ पंतने फोटो शेअर करत

भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतचा एक नवा फोटो समोर आला आहे. रिषभ पंत दुखापतीतून सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. हॉस्पिटलमधून घरी परतल्यानंतर रिषभ पंत आता स्वतःच्या पायावर उभा राहून चालण्याचा प्रयत्न करतोय. काही दिवसांपूर्वी रिषभ पंतचा अपघात झाला होता.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की,रिषभ पंतचा उजवा पाय अजूनही सुजलेला आहे. असे असताना देखील तो स्वतःच्या पायावर उभा राहून चालण्याचा प्रयत्न करतोय. या फोटोला कॅप्शन देत त्याने,”एक पाऊल पुढे,एक पाऊल मजबूत” असे लिहिले आहे. या फोटोमध्ये रिषभ पंत चालण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. तो आयपीएल स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तसेच तो आगामी आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेत देखील खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. मात्र अशी शक्यता वर्तवली जात आहे की, तो लवकरच मैदानावर पुनरागमन करेल.
डिसेंबर २०२२ मध्ये रिषभ पंत आपल्या कार मधून डेहराडूनला आपल्या आईला भेटण्यासाठी जात होता. मात्र कार दुर्घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. त्याची बीएमडब्ल्यू कार डीवायडरला जाऊन धडकली होती. पंत कारच्या बाहेर आला. मात्र त्याच्या कारने पेट घेतला. त्यानंतर तिथून जात असलेल्या काही लोकांनी त्याची मदत केली आणि त्याला त्वरित रुग्णालयात भरती केले.

रुरकी येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पंतला डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर येथे एक आठवडा घालवल्यानंतर पंतला विमानाने मुंबईला नेण्यात आले आणि तेथे त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
हे ही वाचा..
विराटला बाद करताच टॉड मर्फीची पहिली रिॲक्शन आली समोर; वाचा काय म्हणाला…