- Advertisement -

अपघातानंतर पहिल्यांदाच पायावर उभा राहू शकला ऋषभ पंत, कोकिलाबेन रुग्णालयातून डॉक्टरांनी दिली रिषभच्या तब्येतीबाबत मोठी माहिती.आणखी तब्बल एवढे दिवस रहावे लागणार हॉस्पिटलमध्ये…

0 0

अपघातानंतर पहिल्यांदाच पायावर उभा राहू शकला ऋषभ पंत, कोकिलाबेन रुग्णालयातून डॉक्टरांनी दिली रिषभच्या तब्येतीबाबत मोठी माहिती.आणखी तब्बल एवढे दिवस रहावे लागणार हॉस्पिटलमध्ये…


भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरं तर, यापूर्वी अपघाताचा बळी ठरलेला ऋषभ पंत वेगाने बरा होत आहे. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात आहे. शस्त्रक्रियेनंतर टीम इंडियाच्या फलंदाजाच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली आहे. त्याचवेळी अपघातानंतर ऋषभ पंत पहिल्यांदाच पायावर उभा राहिला. मात्र, काही सेकंद तो त्याच्या पायावर उभा राहू शकला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

काय म्हणाले डॉक्टर?

कोकिलाबेन रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ऋषभ पंतला पूर्णपणे बरा होण्यासाठी किमान ४ ते ६ महिने लागतील. म्हणजेच ऋषभ पंत कदाचित या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत मैदानावर दिसणार नाही. मात्र, ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानात कधी परतणार, हे पुनर्वसन आणि प्रशिक्षणावर अवलंबून असेल, असे डॉक्टरांनी यापूर्वी सांगितले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाचे पुनर्वसन आणि प्रशिक्षण सुरू होईल.

ऋषभ पंत किती दिवस रुग्णालयात राहणार?

विशेष म्हणजे ऋषभ पंतवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचवेळी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ऋषभ पंतला जवळपास एक आठवडा रुग्णालयातच राहावे लागणार आहे. टीम इंडियाच्या या धडाकेबाज फलंदाजाला अजूनही चालण्यात अडचण येत असली तरी हा खेळाडू वॉकर आणि इतर आधाराच्या मदतीने चालू शकतो.

ऋषभ पंत

ऋषभ पंत या मालिकांना मुकणार-

भारत-न्यूझीलंड (३ वनडे आणि ३ टी२०) – जानेवारी-फेब्रुवारी
भारत-ऑस्ट्रेलिया (4 कसोटी आणि 3 वनडे) – फेब्रुवारी-मार्च

IPL 2023 (एप्रिल-मे)
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (जर भारत पात्र ठरला) – जून

आशिया कप 2023 – सप्टेंबर
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक – ऑक्टोबर/नोव्हेंबर (तथापि, हे पुनर्वसन आणि प्रशिक्षणावर बरेच अवलंबून असेल.


आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या:

के एल राहुलच्या अर्धशतकामुळे भारताने जिंकला दुसरा एकदिवशीय सामना.. सिरीजसुद्धा भारताच्या नावावर,तरीही के.एल. राहुल होतोय सोशल मिडीयावर ट्रोल, हे आहे कारण..

VIRAL VIDEO: नसीम शहाने टाकला एवढा जबरदस्त योर्कर की, न्यूझीलंडच्या या स्टार फलंदाजाला काही कळायच्या आतचं उडाले स्टंप, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave A Reply

Your email address will not be published.