धोनी अन् विराटला मागे सोडत रोहित शर्मा ठरलाय ‘बॉस’, ‘या’ बाबती केलाय वर्ल्ड रेकॉर्ड!
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा( Rohit Sharma) सध्या भारतीय संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडतोय. त्याने आयसीसी टी -२० विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धेत विजय मिळवून दिला नसला तरी कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याने माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी आणि विराट कोहलीला देखील मागे सोडले आहे. रोहित शर्माच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
भारतीय संघासाठी वनडे क्रिकेटमध्ये ५० पेक्षा सरासरीने १ हजारपेक्षा अधिक धावा करणारे केवळ ३ कर्णधार आहेत. ज्यामध्ये एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. मात्र १ हजार पेक्षा अधिक धावा करताना १०० पेक्षा अधिकचा स्ट्राईक रेट असलेला रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार आहे.
रोहित शर्माबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत एकूण २३ वनडे सामान्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान ७ शतके आणि एकमेव शतकी खेळीच्या जोरावर त्याने १०१९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १०० पेक्षा अधिकचा राहिला आहे. तसेच त्याने आतापर्यंत ७० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान त्याची विजयाची को तयारी ही इतर भारतीय कर्णधारांपेक्षा अधिकची राहिली आहे.
हे ही वाचा…
अखेर केएल राहुल झाला शेट्टी कुटुंबाचा जावई! लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
‘ दोस्त दोस्त ना रहा’,मित्रानेच उमेश यादवला लावला लाखोंचा गंडा; वाचा संपूर्ण प्रकरण