मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी..! रोहित शर्मा नाही खेळणार आयपीएल 2023? हा खेळाडू सांभाळणार मुंबईचे कर्णधारपद..
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी..! रोहित शर्मा नाही खेळणार आयपीएल 2023? हा खेळाडू सांभाळणार मुंबईचे कर्णधारपद..
आयपीएल 2023 येत्या दोन दिवसात सुरू होणार आहे. जवळपास सर्वच संघाने या मोसमासाठी तयारी सुरू केली असून. संघाच्या जर्षी, सर्व खेळाडुंचे नावे आणि पुढील प्लॅन सुद्धा तयार झाला आहे. येत्या 31 मार्चला गुजरात आणि चेन्नई सुपर किंग्स या हंगामातील पहिला सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी बीसीसियायने जबरदस्त अशी ओपनिंग सेरेमणी आयोजित केली आहे. ज्यामधे बॉलीवूड सुपरस्टार अभिनेते आणि अभिनेत्री परफॉर्म करणार आहेत.
आयपीएल(Ipl 2023) सुरू होण्यापूर्वी मात्र आयपीएलमधील सर्वांत प्रसिद्ध फ्रेंचायजी मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माबद्दल ही मोठी अपडेट समोर येत आहे.

नक्की काय आहे अपडेट?
सूत्रांनुसार मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा आयपीएलच्या सुरवातीच्या सामन्यात खेळणार नसल्याची बातमी आहे. रोहितने स्वत हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. खर तर,आयपीएल आणि WTC फायनलमध्ये अत्यंत कमी दिवस आहेत. त्यामुळे भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितिमध्ये डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना जिंकायचाचं आहे. म्हणूनच आयपीएल जेएएसटी खेळून मैदानावर दुखापत करून घेण्याची भीती रोहित शर्माला वाटते. ज्यामुळे त्याने आयपीएलचे सुरवातीचे काही सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहितच्या या निंर्णयाचे मुंबई इंडियन्सने केले स्वागत.. ,रोहित एवजी सूर्यकुमार यादवकडे सोपवली संघाची जबाबदारी..!
रोहित शर्माच्या या निर्णयाचे स्वागत करत मुंबई इंडियन्सने त्याला पहिल्या काही सामन्यात आराम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादरम्यान स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव मुंबाईची धुरा सांभाळताना दिसणार आहे. रिपोर्ट नुसार , रोहित शर्मा आयपीएलचे सुरवातीचे 4/5 सामने मैदानाबाहेर बसू शकतो. परंतु अस असलं तरीही कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) संघासोबत डगआऊटमध्ये मात्र सुरवातीच्या सामण्यापासून असणार आहे.
आता रोहित शर्माच्या वायएए निर्णयाचा मुंबईवर कसा परिणाम होतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. शिवाय सूर्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स सुरवातीचे सामने कसे खेळतो, हे पाहणे सुद्धा मनोरंजक असेल.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…