IND vs NZ LIVE: सामना सुरु असतांना लहान मुलगा रोहितला भेटण्यास आला मैदानावर, सुरक्षारक्षकांनी पकडताच ‘रोहित शर्मा’ने केले असे काम की जिंकली सर्वांची मने.व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवशीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज रायपुरच्या मैदानावर खेळवला गेला. ज्यात भारतीय संघाने अतिशय सहज विजय मिळवून सिरीज सुद्धा आपल्या नावावर केली आहे. मात्र या सामन्याच्या दुसऱ्या पारीमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल फलंदाजी करत असतांना एक नाट्यमय घटना घडली ,ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होतोय.
नक्की काय झाले होते मैदानात?
रोहित शर्माने (ROHIT SHARMA) न्यूझीलंडविरुद्ध शानदार फलंदाजी करताना ५१ धावांची खेळी खेळली, यादरम्यान त्याने दोन शानदार षटकारही मारले. पण सामन्यादरम्यान रोहितच्या क्रेझने चाहत्यांचीहीमने जिंकली. एका मुलाने मैदानात घुसून रोहितला मिठी मारली.
खरं तर, रोहित शर्मा(ROHIT SHARMA) फलंदाजी करत असताना एका मुलाने सुरक्षा रक्षकांना चकमा देत थेट मैदानात प्रवेश केला आणि धावत जाऊन खेळपट्टीवर उभ्या असलेल्या रोहित शर्माला मिठी मारली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, काही वेळातच सुरक्षा रक्षकांनी मुलाला रोहित शर्मापासून वेगळे करून मैदानाबाहेर काढले.
See Love and Care For His Fan.
Rohit Sharma told the security – "let him go, he's a kid".#RohitSharma #NZvsIND pic.twitter.com/qPO9YlYvHJ
— BCCI.TV (@bcci_tv_live) January 21, 2023
सुरक्षा रक्षक त्या लहान मुलाला घेऊन जातांना पाहून रोहित ने जे केले ते पाहून लोक रोहितच कौतुक करत आहे. वास्तविक, बीसीसीआय चा असा नियम आहे की, चालू सामन्यात जर एखादा माणूस, चाहता मैदांत घुसण्याचा प्रयत्न करत असेल किंवा घुसला तर तो गुन्हा मानला जाऊ शकतो आणि त्यासाठी त्याच्यावर दंडात्मक कारवाईचा नियम आहे.
सुरक्षारक्षक त्या मुलाला घेऊन जातानाच कदाचित रोहितला त्या नियमाची आठवण झाली असावी,म्हणूनच त्याने त्या मुलाला स्वतः उचलून घेतले आणि सुरक्षारक्षकांना सांगितले की, ‘तो लहान आहे, त्याला बाहेर नेऊन सोडून द्या’. रोहितच्या या कामगिरीमुळे सगळीकडे त्याचं कौतुक होतंय.
रोहितने 51 धावांची शानदार खेळी खेळली.
रोहित शर्माने ( ROHIT SHARMA) न्यूझीलंडविरुद्ध शानदार फलंदाजी करताना 51 चेंडूत 50 धावांची खेळी केली. यादरम्यान रोहितने ७ षटकार आणि दोन जबरदस्त षटकार ठोकले. रोहितचे फलंदाजी पाहून चाहते चांगलेच खुश झाले आहेत.

आजच्या सामन्यात टीम इंडिया वर्चस्व गाजवत आहे. न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर असहाय्य दिसले आणि अवघ्या 108 धावा करून संपूर्ण संघ ऑलआऊट झाला. त्याचबरोबर भारतीय फलंदाजांनी दमदार सुरुवात करून सामन्यावर पकड मिळवली. भारतीय संघाने हा सामना 8 गडी आणि 30 षटके राखून जिंकला..
या विजयासह भारतीय संघाने ही सिरीज सुद्धा आपल्या नावावर केली.
That Hug🥺. and My Captain Rohit Sharma told the security – "let him go, he's a kid". The most humble cricket ever @ImRo45 🐐❤
pic.twitter.com/WZ3SQHh7NW— Immy|| 🇮🇳 (@TotallyImro45) January 21, 2023
हे ही वाचा…
चेंडू हातात असताना देखील यष्टिरक्षकाने गमावली सहज धावबादची संधी, व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार