भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आजपासून ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. न्यूज एजेंसी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो टी -२० मालिकेतून बाहेर झाला आहे. २५ वर्षीय ऋतुराज गायकवाड बंगळुरु स्थित एनसीएमध्ये पोहोचला आहे. मात्र बीसीसीआयने याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केली नाहीये.
ऋतुराज गायकवाडने हैदराबाद विरुध्द झालेल्या सामन्यात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या सामन्यातील पहिल्या डावात ८ तर दुसऱ्या डावात तो शून्यावर माघारी परतला होता. मिळालेल्या माहितीनुसार ऋतुराज गायकवाडच्या बोटाला दुखापत झाली आहे.
मुख्य बाब म्हणजे यापूर्वी देखील श्रीलंका संघाविरुद्ध टी -२० मालिका खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र तो दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला होता. तसेच वेस्ट इंडिज विरुध्द झालेल्या मालिकेत तो कोव्हिड पॉसिटीव्ह आल्यामुळे मालिकेतून बाहेर झाला होता.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ:
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड (दुखापतग्रस्त), शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.