PSL 2023: बोंबला.. दुष्काळात तेरावा महिना.!.पाकिस्तान सुपरलीगच्या सामन्यात मैदानातून 10 लाख किमतीचे केमेरे आणि जनरेटरच्या बॅटऱ्याही चोरीला…
पाकिस्तान सुपर लीगचा हा सीझन ब्लॉकबस्टर दिसत आहे. मैदानावर चौकार-षटकारांच्या पावसासोबतच खेळाडूंचे वर्तनही चर्चेत आहे. कधी फलंदाज जोडीदारावर बॅट घेऊन धावतोय तर कधी लाईव्ह कॅमेऱ्यात कुणीतरी जोडीदाराचा गाल ओढून पळत आहे. तोपर्यंत ठीक होते. आता तर स्टेडियममध्ये बसवलेले सिक्युरिटी कॅमेरे, केबल्स, जनरेटरच्या बॅटऱ्याही चोरीला गेल्या आहेत. लाहोरमधील ऐतिहासिक गद्दाफी स्टेडियममध्ये ही घटना घडली. या सर्वांची किंमत 10 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
पाकिस्तान सुपर लीगमधील सामने आता लाहोरमध्येही खेळल्या जाणार आहेत. याआधी कराची आणि मुलतानमध्ये सामने झाले आहेत. कराचीमध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले गेले आहेत. आता लीग टप्प्यातील 20व्या सामन्यापर्यंत पीएसएलचे सामने कराची आणि लाहोरमध्ये खेळवले जातील. कराचीने पीएसएलचे अनेक सामने आयोजित केले आहेत. पण या मोसमातील पहिला सामना रविवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. या अगोदरही स्टेडियममधील 10 लाखांचा सुरक्षा कॅमेरा, केबल आणि बॅटरी चोरीला गेली होती.

पीएसएलच्या या टप्प्यात लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर 4 सामने खेळल्या जाणार आहेत. यानंतर क्वालिफायर, एलिमिनेटर आणि अंतिम दोन्ही सामने लाहोरमध्येच खेळले जातील.
चोरीची ही घटना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमबाहेर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये चोर सामान घेऊन पळताना दिसत आहेत. यानंतर गुलबर्ग पोलिस ठाण्यात 2 वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
हेही वाचा:
या महिलेने हिटलरच्या तावडीतून 25000 ज्यू वंशाच्या मुलांची सुटका करून त्यांना नवजीवन दिले होते..