कधी मोल मजुरी तर कधी सिक्युरिटी गार्डची नोकरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या ‘या’ खेळाडूला आयपीएलने बनवले करोडपती..

0

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

आयपीएल 2024: क्रिकेट जगतात आजपर्यंत आपण अनेक खेळाडूंच्या संघर्षाची कहाणी पाहिली आहे. क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत काही खेळाडूंनी बाल वयात अडथळ्यांची शर्यत पार करत क्रिकेटर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. क्रिकेटरच्या या संघर्षपूर्ण कहाणी मध्ये एक क्रिकेटपटू असा आहे जो की, एक एक पैशाला मोहताज होता. एक वेळच्या जेवणासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. कधी मोल मजुरी तर कधी सिक्युरिटी गार्डची नोकरी करून पोट भरावे लागले.

मोल-मजुरी, होमगार्ड यासारख्या छोट्या मोठ्या नोकऱ्या करून क्रिकेटर होण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या या क्रिकेटपटूला आयपीएलने रातोरात करोडपती बनवले आहे. या लीगने त्याला इतका पैसा दिला आहे की ,त्याने कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की त्याला इतका पैसा मिळेल म्हणून. तो क्रिकेटपटू म्हणजे वेस्टइंडीजचा युवा वेगवान गोलंदाज शमार जोसेफ. शमार जोसेफच्या रूपात जागतिक क्रिकेटला एक चांगला युवा खेळाडू मिळाला आहे.

सिक्योरिटी गार्ड से गाबा का हीरो बनने तक, कुछ ऐसा रहा है 'शमर जोसेफ' का सफर

वेस्टइंडीजच्या शमार जोसेफ आयपीएलमुळे झाला करोडपती..

वेस्टइंडीजच्या शमार जोसेफ याला आयपीएल मध्ये लखनऊ सुपरजॉयंट्स संघाने तीन कोटी रुपये देऊन संघामध्ये सामील करून घेतले आहे. शमार पुढील दोन महिने आयपीएल मध्ये खेळताना दिसून येईल. दोन महिन्यापूर्वी त्याला क्रिकेट जगतात कोणीच ओळखत नव्हते. गाबा येथे झालेल्या कसोटी सामन्यात त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाचा घमंड तोडला. या सामन्यात त्याने सात विकेट घेत वेस्टइंडीजला एक रोमहर्षक विजय मिळवून दिला आणि एका रात्रीत तो स्टार झाला.

शमार जोसेफ याच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर लखनऊ सुपरजॉयंट्स संघाने जबरदस्त किंमत देऊन आपल्या संघात घेतले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ‘मार्क वूड’ हा अचानक दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागीच जोसेफची निवड करण्यात आली. लखनऊ संघाने मार्क वूड इतकीच तीन कोटी रुपयांची रक्कम देऊन त्याला संघात घेतले. जोसेफ आता लखपती झाला आहे. एक वेळ त्याची अशी होती की, त्याच्याकडे एक एक रुपया नसायचा. कधी मोलमजुरी तर कधी छोट्या मोठ्या नोकऱ्या करून तो आपला उदरनिर्वाह करायचा.कधी मोल मजुरी तर कधी सिक्युरिटी गार्डची नोकरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या 'या' खेळाडूला आयपीएलने बनवले करोडपती..

शमार जोसेफ आहे मध्यमवर्गीय कुटुंबातून..

वेस्टइंडीजच्या गयाना येथे 31 ऑगस्ट 1999 मध्ये जन्मलेला जोसेफ हा मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. त्याचे बालपण अगदी कष्टात गेले. बालपणापासून त्याला क्रिकेटची आवड होती. गोलंदाजी करण्यासाठी त्याच्याकडे टेनिस किंवा लेदर चा चेंडू नव्हता. तो लिंबू घेऊन गोलंदाजीचा सराव करायचा.

कधी मोल मजुरी तर कधी सिक्युरिटी गार्डची नोकरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या 'या' खेळाडूला आयपीएलने बनवले करोडपती..

माजी क्रिकेटपटूंच्या गोलंदाजीची हायलाइट्स पाहून तो गोलंदाजी शिकला आणि असा गोलंदाज बनला ज्याची गोलंदाजी पाहून जगातले दिग्गज क्रिकेटपटू देखील अचंबित झाले. यंदाच्या आयपीएल मध्ये देखील त्याची धमाकेदार कामगिरी पाहण्यासाठी क्रीडा प्रेमी उत्सुक आहेत.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave A Reply

Your email address will not be published.