“संजू सॅमसन नक्कीच चांगला खेळाडू आहे, परंतु” या कारणामुळे संजू सॅमसनला शेवटच्या दोन्ही एकदिवशीय सामन्यात संधी दिली नाही, स्वतः कर्णधार शिखर धवनने केला खुलासा..
न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शिखर धवनने म्हटले आहे की, ऋषभ पंत ‘मॅच विनर’ आहे आणि त्यामुळे संघासाठी कठीण काळातही त्याला पूर्ण पाठिंबा मिळायला हवा.
खरं तर, संजू सॅमसन बुधवारी संपलेल्या न्यूझीलंडसोबतच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता, तर पहिल्या सामन्यात त्याने 36 धावांचे योगदान दिले होते.
त्याचवेळी ऋषभ पंत गेल्या अनेक सामन्यांमध्ये विशेष छाप सोडू शकलेला नाही. संजू सॅमसन आणि ऋषभ पंत हे दोघेही फलंदाज-विकेटकीपर आहेत. त्यामुळे या दोघांच्या संघातील स्थानाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे.
View this post on Instagram
बुधवारी शिखर धवनलाही विचारण्यात आले की, कर्णधार म्हणून दोन खेळाडूंपैकी एकाची निवड करणे किती कठीण आहे.
यावर तो म्हणाला, “ऋषभ जेव्हा इंग्लंडमध्ये खेळला तेव्हा त्याने तिथे 100 धावा केल्या होत्या. जो 100 धावा करतो त्याला सपोर्ट होतो. नेहमीच मोठे चित्र पाहिले जाते की तो मोठा खेळाडू असेल तर त्याला किती सपोर्ट द्यायचा किंवा नाही. बर्याच गोष्टींचे विश्लेषण करूनच निर्णय घेतला जातो.”
“साहजिकच संजू सॅमसन हा चांगला खेळाडू आहे. तो चांगली कामगिरी करत आहे. त्याला कितीही संधी मिळाल्या, त्याने चांगली कामगिरी केली पण कधी-कधी चांगली कामगिरी करताना प्रतीक्षा करावी लागते कारण, पहिल्या खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे.

आम्हाला माहित आहे की तो सामना विजेता आहे.तो सध्या फोर्ममध्ये नसतांना त्याला काही दिवसांचा वेळ देण्याची गरज आहे. म्हणूनच आम्ही त्याला दोन्ही एकदिवशीय सामन्यात संधी दिली. याठीकानी कोणीही कोणाला पाठीशी घालण्याचे काम करत नाही.
मात्र एक चांगला खेळाडू म्हम्हणून त्याने केलेल्या मागील अनेक सामन्यातील प्रदर्शन पाहता रिषभ पंतला नक्कीच आणखी काही सामने फोर्ममध्ये परत येण्याची संधी दिली जाऊ शकते,असेही यावेळी धवन म्हणाला.
हेही वाचा:
धावा काढण्यात सतत अपयशी ठरूनही रिषभ पंतला चढलाय माज, म्हणाला ” माझी तुलना इतर कोणाशी करू नको”
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..