IND vs SL: पदार्पणाच्या सामन्यातच शिवम मावीने श्रीलंकन फलंदाजांच्या आवळल्या मुसक्या, केवळ इतक्या धावा देत घेतल्या 4 विकेट तर पहिल्याच सामन्यात नावावर केले हे 3 मोठे विक्रम..
भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक 3 सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 3 जानेवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये हाय व्होल्टेज सामन्यात भारताने शेवटच्या क्षणी 2 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पदार्पण करताना युवा वेगवान गोलंदाज शिवम मावीने आपल्या जबरदस्त गोलंदाजीने खळबळ उडवून दिली.
भारताच्या या शानदार विजयात मावीने महत्त्वाचे योगदान दिले. त्याचबरोबर या संपूर्ण सामन्यात भारताची गोलंदाजी मजबूत होती. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते शिवम मावीचे तसेच संपूर्ण टीमचे कौतुक करत आहेत.
शिवम मावीचा सोशल मीडियावर दबदबा

सरलंका विरुद्धच्या पहिल्या T20I सामन्यात शिवम मावीने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याने आपल्या धडाकेबाज गोलंदाजीने दहशत निर्माण केली. मावीने 4 षटकांच्या कोट्यात 5.50 च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करताना 22 धावांत 4 बळी घेतले. त्यामुळे आता सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे.
त्याच वेळी, संपूर्ण भारतीय गोलंदाजी युनिटने अप्रतिम गोलंदाजी केली. उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांनीही २-२ बळी घेतले. याशिवाय अक्षर पटेलने शेवटच्या षटकात 13 धावांचा शानदार बचाव केला. आता संपूर्ण संघाच्या गोलंदाजीचे चाहते सोशल मीडियावर त्यांचे जोरदार कौतुक करत आहेत.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया येथे पहा:
What a spell by Shivam Mavi on debut – 4/22. A fantastic start by Mavi, he becomes the 3rd Indian to pick a four wicket haul on T20i debut. pic.twitter.com/GfQ23Rgzc4
— CRICKET ❣️ (@th3_23) January 3, 2023
A superb spell on debut for Shivam Mavi👌
Shivam Mavi deserve Man of the Match🏆#INDvSL @ShivamMavi23#ShivamMavi pic.twitter.com/85cCBe1Tgg— Jasbir Karhana (@iJasbirKarhana) January 3, 2023
These two are the heroes of this match 🔥#INDvSL | #ShivamMavi | #UmranMalik pic.twitter.com/JIMx4d8Mrr
— ⧼ʀᴏʜɪᴛᴹᴵ⁻ᴵᶜᵀ🇮🇳 (@Rokum45) January 3, 2023