भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 6 गडी गमावून 278 धावा केल्या.
त्याच वेळी, या सामन्यात, 84 व्या षटकात एक अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर क्लीन बोल्ड झाला तरीही त्याला आऊट देण्यात आले नाही. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
श्रेयस अय्यर क्लीन बोल्ड झाला, अंपायरने आऊट दिला नाही
झालं असं की, बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेनच्या 83व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला चांगलाच फटका बसला आणि चेंडू ऑफ स्टंपला लागला, प्रकाश पडला, बेल जागेवरून हलली मार स्टंपवरून खाली नाही पडली. हे पाहून स्वतः श्रेयस अय्यर सुद्धा चकित झाला.

यावेळी नशीब श्रेयसच्या सोबत असल्याचे दिसून आले. बांगलादेशचे खेळाडू हैराण आणि अस्वस्थ दिसले पण श्रेयसच्या चेहऱ्यावर मोठे हास्य होते. कारण त्याला माहीत होते की जोपर्यंत बेल खाली पडणार नाही तोपर्यंत आऊट देता येणार नाही. श्रेयसला या निमित्ताने आपले शतक पूर्ण करण्यासाठी एक नवीन जीवदान मिळाले आहे.
बोल्ड होऊन पण बाद न झाल्यामुळे श्रेयस खुश होता तर दुसरीकडे मात्र बांग्लादेशी गोलंदाज हैराण होते. नशिबाने श्रेयसची साथ दिल्यामुळे पुजारा आणि श्रेयस मैदानावर हसताना दिसत होते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होतोय.
पहा व्हिडीओ:
Bhai naseeb k ghode per sawar ho aaj to iyer bhaiya#shreyasiyer pic.twitter.com/OA1dl21wEi
— Adnan Ansari (@AdnanAn71861809) December 14, 2022
भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याचा DAY-1 सामना संपला आहे. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 6 विकेट गमावून 278 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये चेतेश्वर पुजाराने 90 धावांची खेळी केली आणि श्रेयस अय्यर 81 धावा करून क्रीजवर उभा आहे.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…