IND vs SL LIVE: शुभमन गिलने शतक ठोकताच विराट कोहलीने घेतली गळाभेट तर स्टेडियममधील संपूर्ण लोक उठून उभे राहिले, शुभमन गिलचे अनोख्या अंदाजात शतक सेलीब्रेशन ,व्हिडीओ होतोय व्हायरल..
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा एकदिवशीय सामना आज केरळच्या स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. भारतीय संघाने याआधीच दोन एकदिवशिय सामने जिंकून सिरीज आपल्या नावावर केली आहे. आज तिसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल सध्या भारतासाठी सर्वोत्तम खेळाडू म्हणून समोर आला आहे. 2022 मध्ये त्याने आपल्या क्षमतेची फक्त झलक दाखवली आणि आता 2023 मध्ये तो पुन्हा एकदा पंख पसरताना दिसत आहे.

आज, 15 जानेवारी रोजी, भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात, शुभमन गिलने धडाकेबाज फलंदाजी करताना आपले दुसरे एकदिवसीय शतक झळकावले. हा टप्पा गाठल्यानंतर तो मोठ्या थाटात सेलिब्रेशन करताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आपले दुसरे शतक साजरे करण्यासाठी शुभमनने 97 चेंडू खेळले. या खेळीत शुभमनने 116 धावा काढल्या. ज्यात त्याने 14 चौकार आणि 2 षटकार लगावले. शुभमनच्या शतकानंतर सोशल मिडीयावर चाहत्यांनी कौतुक करायला सुरवात केली आहे. शुभमन सोशल मिडीयावर ट्रेंड करत आहे. पाहूया काही ट्वीट.
🙌🙌💯@ShubmanGill #TeamIndia #INDvSL https://t.co/rLxX3wO2A4 pic.twitter.com/gRQxqIGNNW
— BCCI (@BCCI) January 15, 2023
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…