शुभमन की ईशान किशन? न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कोण करेल रोहित शर्मा सोबत ओपनिंग? कर्णधार रोहित शर्माने स्वतःच केला खुलासा..

शुभमन की ईशान किशन? न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कोण करेल रोहित शर्मा सोबत ओपनिंग? कर्णधार रोहित शर्माने स्वतःच केला खुलासा..
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेलाउद्यापासून सुरवात होत आहे. एकदिवशीय विश्वचषकाच्या दुर्ष्टीने ही मालिका भारतीय संघासाठी महत्वाची असणार आहे. सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने आपल्या ओपनिंग पार्टनरचा खुलासा केला आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये गिल किंवा इशान यांच्यापैकी कोण रोहित शर्मासोबत सलामीला फलंदाजी करू शकतो,याबद्दल वक्तव्य केलं आहे.
हा फलंदाज रोहित शर्मासोबत ओपनिंग करेल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत फलंदाजीसाठी उत्सुक दिसत आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पत्रकारांना उत्तरे दिली आहेत. या दरम्यान त्याने पहिल्या सामन्यातील सलामीच्या जोडीचा खुलासा करत मोठे विधान केले आहे.

रोहितने खुलासा केला आहे की, पहिल्या एकदिवसीय सामन्यात डावखुरा आक्रमक फलंदाज शुभमन गिल त्याच्यासोबत सलामीला येणार आहे. त्याचबरोबर इशान या सामन्यात खेळणार की नाही हे निश्चित झालेले नाही.
रोहितच्या संघात आगमन झाल्यामुळे भारतीय संघाचा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला पहिल्या वनडेत बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. रोहित शर्माने इशानला नाही तर शुभमन गिलला त्याच्यासोबत ओपनिंगची संधी दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
Rohit Sharma confirms Shubman Gill will open tomorrow.
— Johns. (@CricCrazyJohns) January 9, 2023
ईशानने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये द्विशतक झळकावून क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. त्याचे द्विशतक हे आतापर्यंतचे सर्वात वेगवान शतक आहे. त्याने 209 धावांची विक्रमी खेळी खेळली. असे असूनही त्याला संघात स्थान मिळेल असे वाटत नाही.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…