काईल जेमिसनच्या जागी चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील झालेला ‘सिसांडा मगाला’ नक्की कोण आहे? CA 20 मध्ये एकट्याने सनरायझर्सला बनवले होते चॅम्पियन..
काईल जेमिसनच्या जागी चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील झालेला ‘सिसांडा मगाला’ नक्की कोण आहे? CA 20 मध्ये एकट्याने सनरायझर्सला बनवले होते चॅम्पियन..
31 मार्चपासून Indian Premier League 2023 सुरू होत आहे . लीगमधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्यात होणार आहे. मात्र, आयपीएलच्या या नव्या हंगामापूर्वी सीएसके संघाने आपल्या कॅम्पमध्ये मोठा बदल जाहीर केला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाने आपल्या संघात दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज सिसांडा मगालाचा (sisanda magala)समावेश केला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनच्या जागी मगालाचा सीएसकेमध्ये समावेश करण्यात आला आहे. जेमिसनला सीएसकेने एक कोटीच्या मूळ किमतीत विकत घेतले पण दुखापतीमुळे तो आता फ्रँचायझीसाठी खेळू शकणार नाही.

नक्की कोण आहे सिसांडा मगाला?
चेन्नई सुपर किंग्सने सिसांडा मगाला ला काइल जेमिसनच्या जागी संघात दाखल करून घेताच सोशल मीडिया वर त्याचे नाव चांगलेच गजू लागले आहे. मगाला याआधी कधीही एवढा प्रसिद्ध नव्हता. मात्र चेन्नईने आपल्या ताफ्यात सामील करून घेताच तो सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनलाय.चला तर जणून घेऊयं नक्की कोण आहे सिसांडा मगाला?
सिसांडा मगाला ला (sisanda-magala-) आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेकडून 5 वनडे आणि चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 6 विकेट्स घेतल्या आहेत, तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याच्याकडे फक्त 3 विकेट आहेत. त्याला T20 फॉरमॅटमध्ये 127 सामने खेळण्याचा अनुभव आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने 136 विकेट्स घेतल्या आहेत.
सिसांडा मगालाने CA20 मध्ये सनरायझर्स चॅम्पियन बनले होते.
सिसांडा मगाला अलीकडेच प्रसिद्धीच्या झोतात आली होती जेव्हा त्याने आपल्या गोलंदाजीने CA20 लीगमध्ये सनरायझर्स इस्टर्न कॅपला चॅम्पियन बनवले होते. CA20 लीगच्या पहिल्या सत्रात मगालाने आपल्या दमदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. त्याने या स्पर्धेत एकूण 12 सामने खेळले, ज्यामध्ये त्याच्या नावावर 14 विकेट आहेत.
लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-5 गोलंदाजांच्या यादीत मगालाचा समावेश होता. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमध्येही मगाला सीए 20 लीगप्रमाणे दमदार कामगिरी करून आयपीएलमध्ये चॅम्पियन बनवेल अशी आशा बाळगावी लागेल.
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…