क्रिकेटर होण्यासाठी सोडली होती इंजिनीअरिंग,टीम इंडियामध्ये पोहचण्यासाठी केली एवढी मेहनत,खूपच संघर्षदायी आहे या खेळाडूची कहाणी..
क्रिकेटर होण्यासाठी सोडली होती इंजिनीअरिंग,टीम इंडियामध्ये पोहचण्यासाठी केली एवढी मेहनत,खूपच संघर्षदायी आहे या खेळाडूची कहाणी..
भारताकडून क्रिकेट खेळण्याची इच्छा मनात घेऊन अनेक युवा तरुण खेळाडू मेहनत घेत असतात. कधी काही अडचणीमुळे तर कधी नशिबाने साथ न दिल्यामुळे सर्वच खेळाडू भारतीय संघाकडून खेळू शकत नाहीत मात्र काहीखेळाडू असेही असतात जे आपल्या अप्पर इच्छा शक्तीच्या जोरावर कोणत्याही परिस्थिती देशाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण करतातचं. त्यांची मेहनत आणि ध्येय इतके अप्पर असते की नशिबही त्यांना संधी देतेच.
आज आपण ज्या खेळाडूबद्दल बोलणार आहोत तो ही अश्याच खेळाडूंपैकी एक आहे ज्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर नशिबाला सुद्धा आपल्याकडे वळवले आहे. आणि टीम इंडियाकडून खेळण्याचे आपले स्वप्न पूर्ण करून दाखवले आहे.
मात्र इथपर्यंत पोहचण्यासाठी त्याने जे काही कष्ट, परिश्रम केले आहेत ते पाहता तो पुढील खेळाडूंसाठी नक्कीच एक आदर्श ठरणार आहे.
View this post on Instagram
तो खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियामध्ये नव्याने सामील झालेला ‘शाहबाज अहमद’ आहे. टीम इंडियाचा उभारता सितारा म्हणून त्याची ओळख निर्माण होते आहे. मात्र त्याची इथपर्यंत पोहचण्याची कहाणी सुद्धा तेवढीच संघर्षपूर्ण आहे.
चला तर जाणून घेऊया शाहबाज अहमदच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी..
शाहबाज अहमदला ९ अक्टोबरला झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुध्द शिखर धवनच्या काप्तानीत भारतीय संघात डेब्यू करण्याची संधी मिळाली. वयाच्या 27 व्या वर्षी तो भारतीय क्रिकेट संघात दाखल होणारा हरयाणामधील 13वा खेळाडू आहे.
आपल्या डेब्यू सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नसली तरीही त्याने शानदार गोलंदाजी करत 10 षटकात एक गडी बाद केला. त्याच्या या प्रदर्शनामुळे त्याचे चाहते भलतेच खुश आहेत.
पहिल्याच सामन्यात दाखवलेला त्याचा खेळ पाहून दिग्गज खेळाडू सुद्धा त्याला पुढील भविष्यासाठी सुभेच्छा देत आहेत.
म्हणूनच येत्या काही दिवसात त्याच्यातील प्रतिभा पाहता तो नियमित भारतीय संघाकडून सामने खेळतांना दिसू शकतो.
टीम इंडियासाठी खेळतांना पाहून शाहबाज अहमदच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले..
प्रत्येक खेळाडूच्या वडिलांचे स्वप्न असते की एक दिवस त्यांचा मुलगा टीम इंडियाकडून निळ्या जर्सीत खेळेल. ते दिवस त्यांच्या आयुष्यात आले असते तर यापेक्षा अभिमानाचा क्षण त्यांच्यासाठी दुसरा असूच शकत नाही. असाच काहीसा प्रकार शाहबाज अहमदच्या काळात पाहायला मिळाला. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना शाहबाज अहमदचे वडील अहमद जान आणि आई अबनम यांनी त्यांच्या क्रिकेट प्रवासाबद्दल मोकळेपणाने सांगितले आणि ते म्हणाले,
“काहीतरी मोठं करण्याचा त्यांचा निर्धार होता. त्याच्या कॉलेजच्या प्राध्यापकांनीही त्याला सांगितले की तो एक चांगला विद्यार्थी असल्यामुळे ही चूक झाली (इंजिनीअरिंग सोडली). ‘एक दिवस तुम्ही मला माझी पदवी द्याल आणि माझे स्वागतही कराल’, असे शाहबाजने त्यांच्या विभागप्रमुखांना सांगितले होते आणि हे गेल्या वर्षी घडले होते.
शाहबाज अहमदचे वडील अहमद जान बोलत होते,
“त्याला स्वयंपाक कसा करायचा हे माहित नव्हते, म्हणून त्याचे काम भांडी साफ करणे होते.” मी त्याला त्या दिवशी सांगितले की काहीतरी करा, नाहीतर परत येऊ नका.
आपल्या मुलाने शिक्षण घेऊन इंजिनिअर व्हावे, अशी शाहबाज अहमद यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्याला इंजिनीअरिंगला प्रवेश मिळाला, पण शाहबाजने आधीच ठरवले होते की त्याला क्रिकेटपटूपेक्षा इंजिनिअर व्हायचे आहे. याचा वडिलांना खूप राग आला. आणि त्याने आपल्या मुलाला सावध केले आणि एकतर काहीतरी करा, नाहीतर परत येऊ नका.

शाहबाज हा इंजिनीअरिंगचा विद्यार्थी होता. तो हरियाणा सोडून कोलकात्याला गेला आणि त्याची स्वप्ने उडू दिली, कारण त्याला त्याचे करिअर इंजिनीअरिंगमध्ये नाही तर क्रिकेटमध्ये करायचे होते. त्यानंतर शाहबाज अहमद तपन मेमोरियल क्लबशी जोडले गेले. यानंतर या प्रतिभावान अष्टपैलू खेळाडूने हळूहळू क्रिकेट जगतात आपले पाय रोवायला सुरुवात केली.
तो होम टीम बंगालकडून खेळला, जिथे त्याने चांगली कामगिरी केली. याच आधारावर त्याची आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीच्या संघात निवड झाली. जिथे त्याने छोट्या कारकिर्दीत निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा फायदा असा झाला की त्याला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली. हे सर्व जाणून घेतल्यानंतर भारतीय संघापर्यंत पोहोचण्याचा शाहबादचा प्रवास सोपा राहिला नाही, असे म्हणता येईल.
आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या:
व्हिडीओ प्लेलीस्ट:
https://youtu.be/B1LQdUgULdU