- Advertisement -

किस्सा: कधी मैदानावर गवत कापण्याचे काम करणाऱ्या या खेळाडूने कसोटीत भारतीय संघाच्या 8 खेळाडूंना तंबूत पाठवले होते.

0 0

कधी मैदानावर गवत कापण्याचे काम करणाऱ्या या खेळाडूने कसोटीत भारतीय संघाच्या 8 खेळाडूंना तंबूत पाठवले होते.


अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं नाव कमावणाऱ्या अनेक खेळाडूंपैकी काही खेळाडू अशेही आहेत जे आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी काम करून नंतर आपलं क्रिकेर बनण्याच स्वप्न उराशी बाळगून होते. आधी काम नंतर मैदानावर सराव असे दुहेरी मेहनत घेत हे खेळाडू आज अतिशय मोठ्या अश्या उंचीवर जाऊन बसले आहेत. अश्याच खेळाडूंपैकी एक होता तो म्हणजे ‘नॅथन लायन’. कदाचित तुम्ही लायनना ओळखत असाल किंवा नसालही परंतु, तो एक असा खेळाडू आहे जो फक्त आपल्या कौशल्याच्या जीवावर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार बनलाय.

त्याची कहाणीच एवढी प्रेरणादायी आहे की वाचून तुम्हीही त्याच कौतुक कराल..

खेळाडू

नॅथन लायन हा ऑस्ट्रेलियाचा एक स्टार खेळाडू होता. पण खेळाडू बनण्याआधी तो ऑस्ट्रेलियातील एका मैदानावरील गवत कापण्याचे काम करायचा.. लायन तेव्हा चमकला जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाकडून खेळतांना भारताच्या तब्बल 8 खेळाडूंना तंबूत परत पाठवलेलं.

खरे तर हा किस्सा आहे जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर होता. बंगळूर येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यादरम्याननॅथन लायनने दहापैकी आठ भारतीय खेळाडूंना आपला बळी बनवले आणि आपल्या धारदार गोलंदाजीचे प्रदर्शन मांडले. त्याआधी क्रिकेट रशिक त्याला ओळखायचे ते केवळ ऑस्ट्रेलिया संघाचा जास्तीचा गोलंदाज म्हणून..

आज ऑस्ट्रेलियन संघाचा सर्वात मजबूत आधारस्तंभ बनलेला नॅथन लायन हा तोच ‘नॅथन लायन’ होता जो एकेकाळी स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मैदानावरील गवत कापून उदरनिर्वाह करत असे.

2011 मध्ये पदार्पण करणारा नॅथन लियॉन ऑस्ट्रेलियाच्या ऑलरेड ओव्हलच्या मैदानावर गवत कापायचा. नॅथनला मैदानाची काळजी घेऊन जे पैसे मिळायचे त्यातून नाथन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मैदान रिकामे झाल्यावर नॅथन लियॉन मैदानावर एकटाच सराव करायचा.

खेळाडू

एकदा ऍशेस दरम्यान ऑस्ट्रेलियन संघाने त्याला गोलंदाजीच्या सरावासाठी बोलावले.त्यावेळी लायन ड्युटीवर होता आणि त्याला ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडचा फिरकी गोलंदाज ग्राम स्वान प्रमाणे गोलंदाजी करण्यास सांगितले. नॅथनने स्वानप्रमाणेच गोलंदाजी करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

2011 मध्ये, त्याला पदार्पणाची संधी मिळाली आणि नॅथन लियोनने त्याच्या पहिल्याच सामन्यात पाच विकेट घेत सर्वांना आश्चर्यचकित केले. अॅशेस कसोटी मालिकेदरम्यान नॅथन लियॉनचीही इंग्लंडच्या क्रिकेटप्रेमींनी खिल्ली उडवली होती, त्यानंतर त्याचीच नव्हे तर त्याच्या पत्नीचीही लोकांनी खिल्ली उडवली. पण आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने आपल्या खेळात सुधारणा केली आणि आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांची तोंड बंद केली.

आजही ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासात लायन एक महान खेळाडू म्हणून ओळखला जातो..


हेही वाचा:

महेंद्रसिंग धोनीमुळे या भारतीय खेळाडूची कारकीर्द झाली समाप्त, अन्यथा आज असता जगभरातील प्रसिद्ध खेळाडू..

अतिशय विचित्र शौक असलेल्या या नवाबाने चक्क आपल्या कुत्रीचे लग्न थाटामाटात लावलं होत..

दारू आणि सिगारेटचे शौकीन आहेत भारतीय क्रिकेट संघातील हे 5 खेळाडू, 2 नंबरच्या खेळाडूचे नाव वाचून तर सरकेल पायाखालची जमीन…

 

Leave A Reply

Your email address will not be published.