मृत्यू होऊन 400 वर्ष होऊन गेली, तरीही जिवंत आहे हा संत.. गोव्यातील या संताची होतेय सर्वत्र चर्चा…
एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या शरीराचा अंत्यविधी लवकरात लवकर केल्या जातो. कारण मानवाचे शरीर हे नाशवंत आहे.इजिप्तमध्ये काही महत्वाच्या लोकांच्या शवावर रासायनिक प्रक्रिया करून त्यांचा ममी करून संरक्षित केले जायचे. परंतु शरीरावर कोणतिही रसायने न लावता मृत शरीर वर्षानुवर्षे राहू शकते का? आजच्या विज्ञान युगात हे असंभवच वाटते. तरीसुद्धा काही गोष्टी या विज्ञानाच्या बाहेर असतात. असंच काहीस आहे ओल्ड गोवा येथील”बेसिलिका ऑफ जेजूस ” या चर्चमधील संत फ्रांसिस झेविअर यांच्या बद्दल…
चर्चचा इतिहास:बेसिलिका ऑफ बॉम् जेजूस ही एक प्राचीन रोमन कॅथॉलिक चर्च आहे. ती भारतामधील ओल्ड गोवा येथे स्थित आहे. आणि गोवा -युनेकोच्या जागतिक वारसा स्थळांच्या चर्च आणि आधिवेशनाचा भाग आहे. येथेच संत “फ्रांसिस झेविअर”यांचे नश्वर अवशेष ठेवलेले आहेत. “बॉम् जीजस “म्हणजे पोर्तुगीज भाषेत चांगला किंवा हॉली जीजस.
ही चर्च बॅरोक आर्किटेक्चर आणि भारतातील पोर्तुगीजांच्या वेळीचे वास्तूशाश्त्राचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ही चर्च पोर्तुगीजांच्या सात आश्चर्यांपैकी एक आहे.चर्चच्या बांधकामाची सुरवात 1594 ला झाली. व 1605 ला पूर्ण होऊन तयार झाली. त्या वेळी बिषय डॉम एलेक्सओ डि मेलो यांनी हा चर्च पवित्र केला. ही चर्च जागतिक वारसा स्मारक ख्रिस्ती धर्माच्या इतिहासातील महत्वाचे स्थान आहे.
तसेच ही चर्च भारतातील सर्वांत प्राचीन चर्चपैकी एक आहे. या चर्च मध्ये संगमरवर आणि मौल्यवान दगड आणि बर्माच्या सागवानाचे उत्तम काम केले आहे. बाहेरील विस्त्रुत्व अल्टर पेक्षा आत मधील भाग अतिशय साधा आहे येथे संत इग्नेटियस ऑफ लॉयला यांचा एक मोठा पुतळा आहे.
संत लिओला हे संत फ्रांसिस झेविअर यांचे साथीदार होते. त्यांनी जीजस सोसायटीची स्थापना केली होती. त्यांनी संत झेविअर यांना उपदेशामध्ये सांगितले होते की काय फायदा ” जर माणसाने जग मिळवले आणि आत्मा गमावला तर “. चर्चमध्ये संत झेविअर यांच्या जीवनातून प्रेरित होऊन काढलेले चित्र पन आहेत.
ज्या पालखीमध्ये संत फ्रांसिस झेविअर यांचे शरीर ठेवले आहे ती 17व्या शतकातील फोरनटाईन शिल्पकार “जिव्हो बॅटिस्टा फॉगिंनी यांनी डिझाईन केली होती.त्यासाठी त्यांना 1 वर्षाचा कालावधी लागला होता. ती पालखी संपूर्ण चांदीची बनवलेली आहे.चर्चच्या वरच्या बाजूस बॉम जीजस बेसिलिका आर्ट गॅलरी आहे. ज्यामध्ये गोव्याचे चित्रकार डॉम मार्टिन यांचे काही चित्र आहेत.
या चर्चची खरी ओळख आहे ती संत फॅन्सीस झेवियर यांच्यामुळेच. हे वाचून एकदम आश्चर्य होते की, संत फ्रांसिस झेविअर यांचे मृत शरीर आजपर्यंत म्हणजे 400 वर्षांपासून जश्यास तसें आहे. होय हे एकदम खरे आहे. विज्ञान एवढे प्रगत झाल्या नंतरही या रहस्यचा उलगडा कोणतेही वैज्ञानिक करू शकले नाहीत. त्यांचे शरीर अवशेष हे आधुनिक जगातील विज्ञानाला एक आव्हानच असल्यासारखे आहे.
संत फ्रांसिस झेविअर:
ख्रिस्ती धर्माचे लोक संत झेविअर यांचा खूप सन्मान करतात. संत झेविअर यांचा जन्म स्पेन मधील एका राजकुळात झाला होता. ते जसे युवा अवस्थेत पोहचले की त्यांनी घर संसाराचा त्याग करून कॅथॉलिक धर्माचा प्रचार करण्याचा निश्चय केला. त्यांच्या या धर्म कार्यामुळेच त्यांना सेंट म्हणे संत असेल म्हणतात. आजचा ओल्ड गोवा हे त्याकाळी पोर्तुगीजांची राजधानी शहर होते. येथेच त्यांनी सर्वप्रथम आपले धर्म प्रचाराचे काम सुरु केले.
संत फ्रांसिस झेविअर यांनी धर्म प्रचारक असल्यामुळे अनेक देशांच्या यात्रा केल्या. जेव्हा संत भारतात आले त्यांनी सरळ गोवा येथे आले कारण येथे पोर्तुगीज साम्राज्य होते. संत जेविअर यांच्याकडे अनेक अलौकिक शक्त्या होत्या.
त्यांच्या सहारे ते सर्वांचे दुःख दूर करत असत.
सण 1552मध्ये समुद्र यात्रेने चीन येथे जातं असताना चीनच्या अगदी जवळच एका बेटावर त्यांचा मृत्यू झाला. संत झेविअर यांचे मृत शरीर प्रथम मलाका येथे नेण्यात आले. असेल पण म्हटले जाते की, त्यांच्या अनुयायांनी जेव्हा त्यांची पूजा करण्यासाठी त्यांची कॉफिन उघडली तेव्हा आतमध्ये त्याचे शरीर जश्यास तसें होते. हे बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला.
दैवीय चमत्कार म्हणून त्यांच्या शिष्यानी संतांच्या शरीराचे अवशेष त्यांनी कर्मभूमी गोवा येथे आणले
प्रथम त्यांचे शरीर “सेंट पॉल” कॉलेजमध्ये ठेवण्यात आले. नंतर 1613 मध्ये “प्रोफेस्ट हाऊस ऑफ केम जिजस” येथे ठेवण्यात आले. शेवटी त्यांचे शरीर एका पालखीत ठेवून बेसिलिका ऑफ बॉम् जिजस येथे प्रतिष्ठित करण्यात आले. संत फ्रांसिस झेविअर यांच्याबद्दल अनेक कथा आहेत.
त्यानुसार असेही म्हटले जाते की,1553 मध्ये जेव्हा त्याचे शरीर मलाका येथे घेऊन जात होते तेव्हा जहाजाच्या कॅप्टननी त्यांच्या गुढघ्याचे मास ओरबाडले होते. एवढेच नाही तर 1554 मध्ये एक पोर्तुगीज महिला यात्रीने त्यांच्या टाचेचे मास्क कापून आपल्या सोबत पोर्तुगाल येथे स्मृती म्हणून घेऊन गेली. 1695मध्ये संताची एक भुजा रोम येथे पाठवण्यात आली व तेथील चर्चमध्ये स्थापित करण्यात आली. त्याच्या दुसऱ्या हाताचा थोडासा हिस्सा 1619मध्ये जपानच्या “सेजुयेट प्रविंग्स” येथे प्रतिष्टीत केला.
त्यांचे शरीर प्रथम 1662 ला लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. या वेळी त्याचे शरीर हे बेसिलिका हॉलच्या खुल्या जागेवर दर दहा वर्षांनी सार्वजनिक दर्शनास ठेवतात. 22 नोव्हेंबर 2014 ते 5 जानेवारी 2015 पर्यंत त्यांचे शरीर दर्शनासाठी ठेवले होते. 3 डिसेंबर ला दरवर्षी फ्रांसिस झेविअर यांची फिस्त असते गोवा हे राज्य असेही जगभरातील लोकांमध्ये पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. यामुळे जगभरातून अनेक ख्रिस्ती असलेले व नसलेले अनेक पर्यटक संत झेविअर यांच्या दर्शनासाठी एक वेळ अवश्य ओल्ड गोवा येथे येतात.
संत झेविअर यांच्या नावाने आज अनेक शाळा, महाविद्यालय व दवाखाने आहेत. आजच्या विज्ञानच्या काळात बेसिलिका ऑफ बोम जिझस ही चर्च एक अदभूत, अविश्वसनीय आश्चर्यच आहे.