महेंद्रसिंग धोनी सोबत टीम इंडियात पदार्पण करणारा हा खेळाडू केवळ ४ सामनेच खेळू शकला, संघातील राजकारणाचा ठरला शिकार अन्यथा आज असता दुसरा धोनी…!
भारतीय क्रिकेट संघात दरवर्षी अनेक खेळाडू पदार्पण करतात तर काही खेळाडू आपल्या कारकिर्दीला पूर्णविराम देत संघातून निवृत्त होत असतात. भारतीय संघातील अश्याच खेळाडूंपैकी एक असलेला भारतीय संघाचा 2007 च्या पहिल्या टी-२० विश्वकप स्पर्धेत अंतिम षटकात भारताला विजयी करणारा भारतीय संघाचा माजी ऑलराउंडर खेळाडू ‘ जोगिंदर शर्मा’ ला आजपर्यंत कोणीही विसरू शकत नाही.
जोगिंदर असा खेळाडू होता ज्याच्या कामामुळे स्वतः महेंद्रसिंग धोनी देखील आच्छर्यचकित झाला होता. धोनी आणि जोगिंदरने एकाच वर्षी भारतीय संघात डेब्यू केला होता. मात्र धोनी फारपुढे निघून गेला आणि जोगिंदर संघातील अंतर्गत राजकारणाचा शिकार ठरला. आणि केवळ ४ सामनेच खेळून तो भारतीय संघातून बाहेर फेकला गेला.
15 years ago,No one would have expected this young team to win the T20 World Cup!🇮🇳@msdfansofficial @virendersehwag @GautamGambhir @YUVSTRONG12 @robbieuthappa @ImRo45 @DineshKarthik @iamyusufpathan @IrfanPathan @harbhajan_singh @MJoginderSharma @sreesanth36 @rpsingh @imAagarkar pic.twitter.com/XkReohQzlq
— sri vigneswaran DMK (@VickyT82279284) September 29, 2022
जोगिंदर च्या सर्वोत्तम पारीपैकी एक असलेली त्याची पाकिस्तान विरुद्धची खेळी आजही कोणताही क्रिकेटचा चाहता विसरू शकत नाही. कर्णधार म्हणून धोनीचा तो पहिलाच सामना होता. एप्रिल 2007 नंतर राहूल द्रविड नंतर धोनी भारतीय संघाचा कर्णधार झाला आणि आयसीसीचा ट्वेंटी- ट्वेंटी वर्ल्डकप सुद्धा त्याच वर्षी सुरु झाला. आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच वर्षी धोनीला एक मोठी क्रिकेट टोर्नमेंट जिंकण्याची ही चांगली संधी होती.
अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून विश्वचषकावर नाव कोरले. या विजयात जोगिंदर शर्मा खरा हिरो ठरला होता. आणि धोनीच्या कर्णधार पदाची यशस्वी सुरवात खऱ्या अर्थाने याच सामन्यापासून झाली. धोनीला या सामन्यात स्टार बनवण्यामागे जोगिंदर शर्माचा मोठा हात होता.
नक्की काय झाले होते अंतिम षटकात?
माजी क्रिकेटपटू जोगिंदर शर्माने एका मुलाखतील सांगितले होते की, जेव्हा सामना अंतिम षटकापर्यंत आला तेव्हा धोनीने मला गोलंदाजी करण्यास बोलावले आणि सांगितले की, आपण जवळपास हा सामना हरलो आहोत.मात्र तू अंतिम षटक चांगले कर. होप सोडू नकोस. आणि जरी आपण सामना हरलो तरी मी या पराभवाची संपूर्ण जीमेदारी स्वतःवर घेतो.
2007 च्या या अंतिम सामन्यात पाकिस्तानला वर्ल्डकप जिकण्यासाठी अंतीम षटकात 13 धावांची गरज होती. त्यावेळी जोगिंदर शर्माने जबरदस्त गोलंदाजी करत भारतीय संघाला 5 धावांनी विजयी केले होते. सामना झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्वतः धोनीने सुद्धा जोगिंदरची स्तुती केली होती.
छोटी परंतु चांगली होती जोगिंदरची कारकीर्द..

जोगिंदर शर्मा हा असा क्रिकेटर होता ,ज्याने भारतीय संघासाठी अत्यंत कमी काळ क्रिकेट खेळले. आपल्या छोट्याश्या कारकिर्दीत त्याने फक्त ४ एकदिवशीय आणि ४ टी-२० सामने खेळले होते. ज्यात त्याने एकदिवशीय सामन्यात एक तर टी-२० सामन्यात ४ गडी बाद केल आहेत. चार एकदिवशीय सामन्यात त्याने ३५ च्या सरासरीने ३५ धावा काढल्या होत्या.. तेच दुसरीकडे त्याला चारीही ट्वेंटी सामन्यात एकदाही फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
असं म्हटल जात की, जोगिंदर शर्मा मधील क्रिकेटचे ज्ञान पाहता तो लवकरच संघातील इतर खेळाडूना मागे टाकून समोर जाऊ शकला असता. मात्र अचानक त्याच्या आयुष्यात असे काही बदल झाले कि त्याची संपूर्ण कारकीर्दच सुरु होण्याच्या आधीच संपली. स्वतः जोगिंदरने जरी यावर बोलण्यास मनाई केली असली तरीही इतर क्रिकेट तज्ञांच्या मते जोगिंदर ला मुद्दामहून संघातून बाहेर काढण्यात आले होते.
जर जोगिंदर शर्मा धोनीसोबत आणखी काही काळ क्रिकेट खेळत राहिला असता तर नक्कीच भारताच्या क्रिकेट इतिहासात त्याचे नाव दुसरा धोनी म्हणून गाजले असते. मात्र नशिबाला काहीतरी वेगळेच मंजूर होते. आणि जोगिंदर एक लहान खेळाडू बनून राहिला.
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..