IND vs SL LiVE: पहिल्या टी-20 पूर्वी सुर्यकुमार यादवने नेटमध्ये केली जबरदस्त फलंदाजी, शॉट पाहून व्हाल सूर्याचे चाहते,व्हिडीओ होतोय सोशल मिडियावर व्हायरल..
IND vs SL LiVE: पहिल्या टी-20 पूर्वी सुर्यकुमार यादवने नेटमध्ये केली जबरदस्त फलंदाजी, शॉट पाहून व्हाल सूर्याचे चाहते,व्हिडीओ होतोय सोशल मिडियावर व्हायरल..
भारतीय क्रिकेट संघाचा 360 डिग्री खेळाडू सूर्यकुमार यादवसाठी गत वर्ष खूप चांगले होते. 2022 मध्ये, त्याने 31 T20 सामने खेळले, 46.56 च्या सरासरीने 1164 धावा केल्या. यादरम्यान सूर्यकुमारचा स्ट्राइक रेट १८७.४३ होता. एवढेच नाही तर आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर तो आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा फलंदाज बनण्यात यशस्वी ठरला
2023 मध्येही हा उजव्या हाताचा फलंदाज आपली कामगिरी कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) खेळल्या जाणार्या T20 मालिकेपूर्वी, सूर्यकुमार यादवने नेटमध्ये जोरदार प्रयत्न केला, ज्याचा व्हिडिओ BCCI ने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे, तर सूर्यकुमारला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
मालिका सुरू होण्यापूर्वी उजव्या हाताच्या फलंदाजाने नेटमध्ये घाम गाळला. यादरम्यान त्याने काही शानदार शॉट्सही खेळले. त्याच्या फलंदाजीच्या सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
A new year 🗓️
A new start 👍🏻
A new Vice-captain – @surya_14kumar – for the Sri Lanka T20I series 😎#TeamIndia had their first practice session here at Wankhede Stadium ahead of the T20I series opener in Mumbai 🏟️#INDvSL | @mastercardindia pic.twitter.com/qqUifdoDsp— BCCI (@BCCI) January 2, 2023
हा व्हिडिओ शेअर करताना बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले की,
नवीन वर्ष, नवीन सुरुवात, नवीन उपकर्णधार. टीम इंडियाने वानखेडे स्टेडियमवर टी-20 मालिकेच्या सलामीपूर्वी सराव केला.