सुर्यकुमार यादवने कसोटीत पदार्पण करण्याची इच्छा तर बोलून दाखवलीय,परंतु हे 2 खेळाडू असे पर्यंत सूर्याची इच्छा पूर्ण होने कठीण वाटतंय..
सुर्यकुमार यादवने कसोटीत पदार्पण करण्याची इच्छा तर बोलून दाखवलीय,परंतु हे 2 खेळाडू असे पर्यंत सूर्याची इच्छा पूर्ण होने कठीण वाटतंय..
भारतीय संघाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव टी-२० फोर्मेटमध्ये आपल्या फलंदाजीने सध्या धुमाकूळ घालतोय. मागच्या सहा महिन्यात सूर्या खेळत असलेला एकही सामना असा गेला नाही ज्यात सूर्याने धावा काढल्या नाहीत. हा विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात सूर्या धावा काढू शकला नाही ,टी गोष्ट वेगळी.
मात्र सूर्याचा फोर्म पाहता त्याच्यापुढे एकही गोलंदाज टिकत नाही, हे मात्र खरे. न्यूझीलंडसोबतच्याच्या दुसऱ्या टी-२० मध्ये शानदार शतक ठोकल्यानंतर सूर्याने लवकरच आपल्याला भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पण सूर्यासाठी ही गोष्ट सोपी असणार नाही.. त्यामागचे काही कारणे आता माही तुम्हाला सांगणार आहोत..
View this post on Instagram
चितगाव येथे १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी अष्टपैलू रवींद्र जडेजा पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता नाही. भारतीय क्रिकेट संघाच्या सूत्राने ही माहिती दिली. भारतासमोर पहिला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन, डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज कुलदीप यादव असे तीन पर्याय आहेत, त्यामुळे संघात चौथ्या स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाजाची फारशी गरज नाही. संघ व्यवस्थापनाला जडेजासारखा फिरकीपटू अष्टपैलू हवा असेल, तर ही जागा भरून काढू शकतो तो म्हणजे ‘गोलंदाज सौरभ कुमार’
शिवाय सध्या अशीही अटकळ आहे की नवीन निवड समिती किंवा भारतीय संघ व्यवस्थापन (तोपर्यंत नवीन समिती स्थापन न झाल्यास) सूर्यकुमार यादवच्या उत्कृष्ट फॉर्मची खेळाच्या लांबलचक स्वरूपात चाचणी घेऊ इच्छित आहे. भारताला बांगलादेशमध्ये दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील एक मजबूत संघ शेजारच्या देशाचा दौरा करण्यासाठी सज्ज आहे.
पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर भारत 14-18 डिसेंबर दरम्यान चितगाव आणि 22-26 डिसेंबर दरम्यान मीरपूर येथे दोन कसोटी सामने खेळणार आहे. यूएईमध्ये झालेल्या आशिया चषकानंतर जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि तो अनिश्चित काळासाठी संघाबाहेर होता.

बीसीसीआयच्या एका सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, “जडेजा अनेक वेळा त्याच्या तपासणी आणि पुनर्वसनासाठी एनसीएमध्ये गेला आहे. सध्या तरी तो बांगलादेश मालिकेसाठी तंदुरुस्त असण्याची शक्यता नाही. चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील माजी निवड समितीने मात्र त्याला पुन्हा तंदुरुस्तीच्या अटीवर संघात ठेवले. या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान सौरभ कसोटी संघाचा भाग होता. बंगळुरू येथे झालेल्या ‘अ’ कसोटी मालिकेत त्याने न्यूझीलंड अ विरुद्ध पाच विकेट्स घेतल्या होत्या.
त्यामुळे जोपर्यंत तो कसोटी संघात आहे तोपर्यंत जडेजा साठी काही काळ कठीण असणार आहे. शिवाय सुर्यकुमारला एवढ्या लवकर कसोटी संघात स्थान देण्याच्या बाबतीत नवीन निवड समितीतरी विचार करणार नाही. कारण कसोटी संघातील सध्या एकाही खेळाडूला बदलण्याची गरज नसल्याचा रिपोर्ट मागेच बीसीसीआयकडे पोहचला होता.
म्हणूनच जर सूर्याला याच वर्षात कसोटी पदार्पण करायचे असेल तर सध्या खेळत असलेल्या सलामीच्या फलंदाजांपैकी एकजण कोणीतरी काही कारणांवस्तव कसोटी संघातून बाहेर पडेल तरच सूर्याला त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून खेळता येऊ शकेल.
सूर्या ज्या खेळाडूंना रिप्लेस करू शकतो त्यांमध्ये श्रेयस अय्यर, रोहित शर्मा,विराट कोहली यांपैकी एक खेळाडू असेल .शिवाय के.एल. राहुलच्या जागी सूर्याला संधी मिळण्याची शक्यता सर्वांत जास्त आहे.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
युवराज सिंगच्या विक्रम तोडण्यास उतावळा झालाय हा भारतीय खेळाडू, एका षटकात ठोकू शकतो 6 षटकार!