प्रामुख्याने आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे परंतु आपल्या देशात सर्वाधिक लोकांना क्रिकेट खेळाचे वेड आहे. आपल्या देशात लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकालाच क्रिकेट चे वेड आहे हे आपल्याला माहीतच आहे.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय सामन्यात 100 पेक्षा कमी धावात बाद झाला होता याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.
54 धावा:-
2000 साली शारजाहमध्ये भारत श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला 299 धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु भारतीय क्रिकेट संघ केवळ 54 धावांवर च संपूर्ण बाद झाला होता.
63 धावा:-
1981 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ एका सामन्यात 63 धावांत गारद झाला होता. ऑस्ट्रेलियाने हा सामना 9 विकेटने जिंकला होता. अवघ्या 63 धावांवर भारतीय संघ बाद झाल्यामुळे अत्यंत लाजिरवाणी हार भारतीय संघाची झाली होती.
78 धावा:-
24 डिसेंबर 1986 रोजी कानपूरमध्ये झालेल्या श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ केवळ 78 धावांवर ऑलआऊट झाला होता. या सामन्यात श्रीलंका संघाने हा सामना 7 विकेट ने जिंकला होता.
79 धावा:-
1978 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ पाकिस्तान विरोधात केवळ 79 धावांत ऑल आऊट झाला होता.
91 धावा:-
2006 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर, भारतीय संघ एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 249 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ 91 धावा करून गारद झाला होता. या सामन्यात सुद्धा भारतीय संघाला मोठा पराभव स्वीकारावा लागला.
92 धावा:-
भारतीय संघाने गेल्या वर्षी न्यूझीलंडचा दौरा केला होता. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या हॅमिल्टन एकदिवसीय सामन्यात 92 धावांवर बाद झाला.