पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ..
पाकिस्तान संघाने पहिल्या सेमीफायनल सामन्यात आज न्यूझीलंडचा पराभव करून थेट अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळे आता चाहते पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भारत पाकिस्तान एकमेकांशी भिडणार ,असे बोलत आहेत.मात्र पाकिस्तानशी भिडायचे असेल तर भारतीय संघाला अगोदर इंग्लंड संघाला घरचा रस्ता दाखवावा लागणार आहे.त्यामुळे भारतीय संघ आपला सर्वांत चांगला ११ खेळाडूचा संघ इंग्लंडविरुद्ध खेळवनार आहे.
यावेळी टी-२० वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली दिसत आहे. जिथे उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या टीम इंडियाचा १० नोव्हेंबरला इंग्लंडशी सामना होणार आहे. रोहित शर्माने एक खास रणनीती आखली आहे, जेणेकरून हा सामना जिंकून अंतिम फेरीत पोहोचावे आणि टीम इंडियाचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करावे. याशिवाय उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही मोठा बदल होणार असून अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.
View this post on Instagram
टीम इंडिया सध्या T-२० विश्वचषकात गट दोन मध्ये अव्वल स्थानावर आहे, जिथे रोहित शर्माने आता उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध सामना करण्यासाठी वेगळी रणनीती आखली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात नेहमी प्रमाणे रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामी करताना दिसणार असल्याचे मानले जात आहे.
केएल राहुलने बांगलादेश आणि झिम्बाब्वे विरुद्ध शानदार खेळी खेळली होती. रोहित शर्मा आणि केएल राहुल उत्कृष्ट फॉर्म मध्ये आले तर इंग्लंडचे गोलंदाज त्यांचे काही बिघडवू शकणार नाहीत.
सेमीफायनल मॅच मध्ये टीम इंडियाच्या मधल्या फळी बद्दल बोलायचं झालं तर, नेहमीप्रमाणेच किंग कोहलीचे तिसऱ्या क्रमांकावर उतरणे निश्चित आहे. याशिवाय ३६० डिग्री म्हणून प्रसिद्ध असलेला सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे, जो सध्या अतिशय धोकादायक फलंदाजी करताना दिसत आहे आणि त्याने या विश्वचषकात आता पर्यंत तीन अर्धशतके झळकावली आहेत.
दुसरीकडे, चौथ्या क्रमांकावर हार्दिक पांड्या आणि पाचव्या क्रमांकावर यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला संधी मिळू शकते, कारण ऋषभ पंतने झिम्बाब्वे विरुद्ध अतिशय खराब खेळ दाखवला होता, त्यामुळे त्याला वगळले जाऊ शकते.
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..