2024 च्या वर्ल्डकपआधीच जाणार रोहित शर्माने कर्णधारपद, या 3 खेळाडूंपैकी एकजण होऊ शकतो टीम इंडियाचा नवा कर्णधार..
टी -२० वर्ल्डकपवर काळ इंग्लडने आपले नाव कोरले. पाकिस्तानला पराभूत करून इंग्लंड दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकणारा संघ ठरला. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्डकप २०२२ संपला आहे. मात्र टीम इंडियाची या वर्ल्डकप मधील कामगिरी पाहता संघावर आजूनही चाहते आणि माजी खेळाडू नाराज आहेत. खास करून कर्णधार रोहित शर्मावर तर लोक खूपच नाराज आहेत आणि रोहितला संघातून बाहेर करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
अनेकांचे म्हणणे आहे की त्याने आताच कर्णधारपद सोडावे आणि आतापासूनच २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी कर्णधार म्हणून नवीन कर्णधाराची नियुक्ती करावी. अशा परिस्थितीत टीम इंडियाकडे 3 खेळाडू आहेत जे रोहित शर्मानंतर कर्णधार बनण्याच्या शर्यतीत पुढे आहेत.
View this post on Instagram
हार्दिक पांड्या: या यादीत पहिले नाव आहे हार्दिक पंड्या, ज्याने टीम इंडियाचे कर्णधारपदकाही सामन्यात भूषवले आहे आणि रोहित शर्माच्या जागी भारतीय संघाचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे. आयर्लंड दौऱ्यापासून त्यांनी टीम इंडियाची धुरा सांभाळली. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा आयर्लंड दौऱ्यासाठी उपस्थित नव्हता. संघातील जवळपास वरिष्ठ खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर होते. अशा परिस्थितीत हार्दिककडे संघाची कमान सोपवण्यात आल्याने त्याने निराश केले नाही. या दौऱ्यात हार्दिकने चांगली कप्तानी करत संघाला मालिका जिंकून दिली होती.
यासोबतच हार्दिकने वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारताचे नेतृत्वही केले आहे. पांड्याने 3 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून यादरम्यान भारताने सर्व सामने जिंकले आहेत. यादरम्यान हार्दिकच्या विजयाची टक्केवारी 100 झाली आहे.
View this post on Instagram
ऋषभ पंत: या यादीत दुसरे नाव आहे ते म्हणजे भारतीय संघाचा यष्टीरक्षक ‘ऋषभ पंत. रिषभने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या टी-20 मालिकेत कर्णधारपदाचा पदार्पण केले. रोहित शर्माची जागा घेण्याच्या शर्यतीत पंत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला अनेक वेळा संघाचा उपकर्णधार बनवून भविष्यात तो भारताचा कर्णधार होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. “मी पोरांना सांगत होतो मात्र ते ऐकले नाही” अंतिम सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाल्यावर बाबर आझमचा सुटला ताबा, रागाच्या भरात बोलून टाकले सर्व..
पंतने आफ्रिकेविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले होते, त्यापैकी भारताने 2 जिंकले आणि 2 गमावले तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. यादरम्यान पंतच्या कर्णधारपदाच्या विजयाची टक्केवारी 50 झाली आहे.
केएल राहुल: या यादीत तिसरे नाव आहे केएल राहुलचे, ज्याने या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कर्णधारपदाचा पदार्पण केले होते. रोहित शर्माच्या जागी राहुल तिसऱ्या क्रमांकावर आहे. तो टीम इंडियाचा उपकर्णधारही आहे. राहुलने 8 सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषवले आहे, त्यापैकी 4 हरले आहेत आणि 3 जिंकले आहेत. यादरम्यान त्याच्या विजयाची टक्केवारी वनडेमध्ये 50, टी-20मध्ये 100 आणि कसोटीत 0 अशी आहे. त्यामुळे राहुल सुधा भारतीय संघाचा कर्णधार बनण्याच्या शर्यतीत आहे, हे नक्की..
बीसीसीआय लवकरच रोहित शर्मा, विराट कोहली आणि संघाच्या कोचसोबत एक बैठक पार आहे, ज्यात भारतीय टी-२० संघाची नवीन वाटचाल ठरवण्यात येईल,अस सूत्रांकडून कळले आहे..
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…