क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नसला तरी सर्वात जास्त आपल्या देशात क्रिकेट खेळ खेळला जातो. तसेच क्रिकेट चे अत्यंत वेड असणारे लोक आपल्या देशात आहेत. देशातील 70 टक्के जनता क्रिकेट प्रेमी आहे.

तर मित्रांनो आज आम्ही या लेखात 4 अश्या लोकप्रिय खेळाडू बद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्या शेवटच्या टेस्ट मॅच मध्ये झीरो धावा वर आऊट झाले आहेत तर जाणून घेऊया कोण आहेत हे खेळाडू.
1)अजहर अली:-
पाकिस्तान संघाचे आक्रमक फलंदाज म्हणून अजहर अली ला ओळखले जाते. अजहर अली ने नुकत्याच संपलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली. या कसोटी मध्ये अजहर अली शेवटच्या डावात जॅक लीचविरुद्ध 0(4) धावांवर आऊट झाला.
अजहर अली यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर अजहर अली ने एकूण 97 सामने खेळले असून त्यामधे 42.26 च्या सरासरीने 7142 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेट मध्ये त्याच्या नावावर 19 शतके, 3 द्विशतके आणि 35 अर्धशतके आहेत.
2)सौरव गांगुली:-
सौरव गांगुली हा भारताचा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. सौरव गांगुली हा भारतीय संघाचा माजी कर्णधार सुद्धा होता. सौरव गांगुली ने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची कसोटी खेळली आणि त्या सामन्यात जेसन क्रेझाने त्याला दुसऱ्या डावात पहिल्याच बॉल वर बाद केले. त्या सामन्यात सौरव गांगुली ने 85 धावा काढल्या होत्या.
सौरव गांगुली च्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर सौरव गांगुली ने एकूण 113 सामने खेळले आहेत आणि 42.18 च्या सरासरीने 7212 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने आपल्या बॅटने 16 शतके, एक द्विशतक आणि 35 अर्धशतके झळकावली आहेत.
3)सर डॉन ब्रैडमैन:-
सर डॉन ब्रॅडमन या खेळाडू ला सर्वात महान फलंदाज म्हणून ओळखल जाते. परंतु शेवटच्या कसोटी मध्ये ब्रॅडमन शून्यावर बाद झाला हेही सर्वांना माहीतच असेल. ब्रॅडमनच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर त्याने 52 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आणि 99.94 च्या सरासरीने 6996 एवढ्या धावा केल्या. कसोटीत त्याच्या नावावर 29 शतके, 12 द्विशतके आहेत.
4)शिवनारायण चंद्रपॉल:-
वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलनेही शेवटच्या डावात शून्य धावसंख्या नोंदवलेली तुम्हाला माहीतच असेल. 2015 साली इंग्लंडविरुद्ध शिवनारायण ने शेवटच्या टेस्ट मॅच मध्ये अँडरसनने त्याला बाद केले होते.
चंदरपॉलच्या कसोटी कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर त्याने 164 सामने खेळले आहेत आणि या मध्ये 51.37 च्या सरासरीने 11867 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने 30 शतके, 2 द्विशतके आणि 66 अर्धशतके झळकावली आहेत.