बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ स्पर्धेतील पहिल्या २ सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी केली आहे. यासह मालिकेत २-० ची आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या १ मार्चपासून सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय फॅन्ससाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा सामना…
तिसरा कसोटी सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा कसोटी सामना जिंकताच भारतीय संघाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकणार आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचे तिकीट देखील मिळणार आहे.

३१५ रुपयांत भेटा रोहित अन् विराटला..
मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर पार पडणार आहे. या स्टेडियममध्ये सर्वात स्वस्त तिकीट ३१५ रुपयांचे आहे. याचा अर्थ असा की, तुम्हाला रोहित आणि विराटला लाईव्ह खेळताना पाहायचं असेल तर केवळ ३१५ रुपये खर्च करावे लागतील. सर्व या सामन्यासाठी सर्वात महागडे तिकीट १९६८ रुपयांचे आहे. हा सामना पाहण्यासाठी देखील स्टेडियममध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळू शकते.