क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
नमस्कार मित्रांनो! क्रिकेट हा असा खेळ आहे की ज्यामध्ये साधारणत: बॅट्समनची जास्त चालत असते. आपल्या बॅटने हवा तो चेंडू हवा त्या दिशेने आपल्या कौशल्याने तो भिरकावू शकतो. त्यामुळे बरेचदा प्रत्येक मॅचमध्ये अनेक वेळा बॅट्समनलाच मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळालेला आपण पाहतो. तसेच प्रेक्षकांची किंवा चाहत्यांची जरी गोष्टी घेतली आणि त्यांना विचारले की क्रिकेट मधला आपला आवडता खेळाडू कोणता तर त्यामध्ये ते जवळपास ८५ ते ९० टक्के पेक्षा जास्त हेच सांगतात की आमचा आवडता हा खेळाडू आहे आणि त्यामध्ये तो बॅट्समनच निघतो. त्यामुळे एकंदर क्रिकेटमध्ये बॅटिंग वाल्यांना जास्त वाव असतो असे आपण म्हणू शकतो. पण आपण या आर्टिकल मध्ये जगातील ५ टॉप बॉलर ची गोष्ट करणार आहे.
View this post on Instagram
होय मित्रांनो! हे तेच बॉलर आहेत ज्यांनी आपल्या कार्यकाळात चांगल्या चांगल्या बॅट्समनचे छक्के सोडवले. याबाबत खेळावे कसे असे अनेक बॅट्समनला समजत नव्हते. त्यांची टीम, कोच सर्वच त्या बॉलरबाबत परेशान राहायचे. यांचा बॉल इतक्या गतीने यायचा की बॅट्समनला बॅट वर करायला सुद्धा संधी मिळेना. अशाच बॉलर बाबत आपण जाणून घेऊ आणि त्यांची स्पीड सुद्धा जाणून घेऊ.
५) जेफ थॉमसन : यामध्ये ७०च्या दशका मधला खेळाडू ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळत होता ; त्याचे नाव आहे जेफ थोमसन. जेफने आपली क्रिकेटमधली सुरुवात २९ डिसेंबर १९७२ रोजी पाकिस्तान विरुद्ध च्या सामन्यात खेळताना केली. १९७९ मध्ये वेस्ट इंडिज या संघाविरुद्ध टेस्ट मॅच खेळत असताना नवीन रेकॉर्ड केला. यांशनी आत्तापर्यंतची क्रिकेट मधली सर्वात फास्ट बॉलिंग या ओवर मध्ये केली. त्याने तब्बल १६०.६ च्या गतीने बॉलिंग करत समोरच्या संघाला अडचणीत आणले. जेफच्या फक्त नावे ५१ टेस्ट मॅच असून यामध्ये त्यांनी २८ रन प्रत्येक मॅचमध्ये असे रन देऊन तब्बल २०० विकेट्स आपल्या नावावर केलेल्या आहे. तर त्याची वन डे क्रिकेट मधील कामगिरी पाहता तो ४९ मॅचेस खेळला असून त्यामध्ये ५५ विकेट त्याच्या नावावरती आहे.

४) शोन टेट : जेफ थोभसन नंतर ऑस्ट्रेलियाचाच बोलर शॉन टेट त्याचे नाव घेतले जाते. २०१० मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळताना १६०.७ च्या स्पीडने बॉलिंग केली. याचे क्रिकेट करिअर फार काळ चालले नाही. उद्भवलेल्या अनेक आरोग्य विषयक समस्या मुळे याला घरीच बसावे लागले. त्याच्या नावे केवळ ३ टेस्ट मॅच असून यामध्ये शोन ने ५ विकेट घेतल्या आहे.
३) शॉन टेट : या यादीमध्ये पुन्हा नवा विक्रम केला म्हणून शोनचेच नाव पुन्हा एकदा घेतले जाते. याच वर्षात २०१० मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना आपला पूर्वीचा विक्रम मोडीत काढत या वेळेला १६१.१ या स्पीड बॉलिंग केली. त्याचे वनडे करिअर पाहता ३५ मेसेज तो खेळला असून ५.१९ च्या एव्हरेज ने रन देऊन ६२ विकेट आपल्या नावावरती त्यांनी केलेल्या आहे.
२) ब्रेट ली : पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया संघाकडेच आपल्याला पहावे लागते. यावेळी ऑस्ट्रेलिया संघातून ब्रेट ली या बॉलर चे नाव पुढे येते. ब्रेट ली ने सुद्धा आपल्या दशकामध्ये खूप नाव कमावले होते. ९० च्या दशकामध्ये होऊन गेलेला बॉलर त्या काळात सर्वांच्या ह्रदयात बसलेला होता. त्या काळात जर आपण एखाद्याला विचारले की ब्रेट ली तर ब्रेट ली बाबत प्रत्येक व्यक्ती सांगू शकत होता; असे ब्रेट ली चे नाव झाले होते. ब्रेट ली च्या नावाने एकूण २३१ मॅचेस असून त्यामध्ये त्यांनी ४.७६ अशा प्रकारे रन देऊन ३८० विकेट्स पटकावल्या आहे. २००५ साली न्यूझीलंड विरुद्ध खेळताना १६१.१ अशा स्पीडने त्याने बॉलिंग करून प्रतिस्पर्धी बॅट्समनला अक्षरशः घाईस आणले होते.
Contributions of @Saqlain_Mushtaq @yousaf1788 @shauntait161 & @HaydosTweets should not be ignored.
Specially Hayden, he has been phenomenal for this team. What dedication & love. pic.twitter.com/sG2O3zK2qZ— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 9, 2022
१) शोएब अख्तर : मित्रांनो जगातील सर्वात जलद गतीने बॉलिंग करणारा बॉलर कोणता असे विचारल्यास पाकिस्तानच्या या खेळाडूचे नाव पुढे येते. शोएब अख्तर हे नाव घेताच हृदयात धडाडी भरे. कारण त्याची स्पीड इतकी होती की शोएब जर टीम मध्ये असला की पाकिस्तानचे नागरीक असं समजायचे की आपण मॅच जिंकलोच. आपल्या क्रिकेट आयुष्यात शोएबने १६३ मॅचेस खेळल्या. त्यामध्ये त्यांनी २४७ विकेट आपल्या नावावरती केल्या. ४.७६ याचाही ऍव्हरेज रण देण्याचा क्रम आहे. वर्ल्ड कप मध्ये २००३ साली खेळत असताना इंग्लंड विरुद्ध च्या सामन्यात १६१.३ प्रति तास अशा वेगाने शोएबने बॉलिंग केली. आणि ही जगातली सर्वात जलद गतीची बॉलिंग स्पीड धरल्या गेली. यानंतर याच्या वरच्या गतीने फेकलेला बॉल आढळलेला नाही म्हणजेच नोंदल्या गेलेला नाही.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..