क्रिकेट हा जरी आपला राष्ट्रीय खेळ नसला तरी आपल्या देशात हॉकी पेक्षा क्रिकेटचे वेड लोकांमध्ये जास्त आहे. आपल्या देशात लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत लोकांना चांगलेच क्रिकेट चे वेड आहे.
आपला राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे परंतु आपल्या देशात अनेक लोकांना हॉकी खेळाडूंची नावे सुद्धा माहीत नाही. यावरूनच आपल्याला समजते की आपल्या देशात लोकांमध्ये क्रिकेट चे वेड किती आहे. आपल्या देशातील तरुणाई मध्ये क्रिकेट चे वेड मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातले त्यात आयपीएल चे तर सर्वात जास्त.
क्रिकेट मध्ये कसोटी क्रिकेट मध्ये खूपच हळू हळू खेळले जाते कारण कसोटी क्रिकेट मध्ये फॉर्म पेक्षा जास्त टिकून खेळण्याला महत्व असते. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये असे फक्त 4 फलंदाज आहेत ज्यांनी दोन त्रिशतके झळकावली आहेत. आज आम्ही तुम्हाला त्या फलंदाजांबद्दल सांगत आहोत. या मध्ये आपल्या भारतीय फलंदाजांचा सुद्धा समावेश आहे.

डॉन ब्रैडमैन :-
डॉन ब्रैडमैन हा जगातील महान फलंदाज म्हणून ओळखले जाते. कारण डॉन ब्रैडमैन ने कसोटी क्रिकेट मध्ये तीन शतके झळकावली होती. ब्रॅडमन ने पहिले त्रिशतक हे 1934 मध्ये होते तर दुसरे 1930 मध्ये झळकले होते.
क्रिस गेल :-
क्रिस गेल ला अत्यंत आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जाते. क्रिस गेल सामना जिंकणे अशक्य असल्यावर सुद्धा आक्रमक फलंदाजी करून सामना जिंकवू शकतो एवढे सामर्थ्य क्रिस गेल मद्ये आहे. ख्रिस गेलने कसोटी क्रिकेटमध्ये दोनदा त्रिशतक ठोकली आहेत. क्रिस गेल ने 2005 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा 317 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या वेळेस क्रिस गेल ने 2010 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 333 धावांची इनिंग खेळली होती. आणि 2 त्रिशतके झळकावली होती.
ब्रायन लारा:-
ब्रायन लाराने आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत दोनदा ३०० हून अधिक धावा केल्या. त्याने 2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदा 400 धावा केल्या होत्या. यापूर्वी त्याने 1994 मध्ये इंग्लंडविरुद्ध 375 धावा केल्या होत्या.
वीरेंद्र सेहवाग:-
वीरेंद्र सेहवाग हा एकमेव भारतीय फलंदाज आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके झळकावली आहेत. सेहवागने 2004 साली पाकिस्तानविरुद्ध पहिले त्रिशतक झळकावले होते. आणि 2008 मध्ये त्याने दुसरे त्रिशतक झळकावले. आजपर्यंत केवळ एकच भारतीय खेळाडूने पाकिस्तान संघाविरुद्ध त्रिशतक ठोकले आहे.