- Advertisement -

‘ दोस्त दोस्त ना रहा’,मित्रानेच उमेश यादवला लावला लाखोंचा गंडा; वाचा संपूर्ण प्रकरण

0 3

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) हा  फसवणुकीचा बळी ठरला आहे. नागपुरातील कोराडी येथील उमेश यादव याने आपल्या माजी व्यवस्थापकाविरुद्ध सुमारे ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. उमेश यादवच्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उमेश यादवने ही तक्रार आपला माजी व्यवस्थापक शैलेश ठाकरे विरुध्द नोंदवली आहे. माजी व्यवस्थापक असल्यामुळे शैलेशकडे उमेश यादवच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती आहे. उमेश यादवने असा आरोप केला आहे की, त्याने पैसे घेतले मात्र जे काम करण्यासाठी दिले होते, ते पूर्ण केलेच नाही.

ज्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे,ते मालमत्तेशी संबंधित आहे. उमेश यादवने संपत्ती खरेदी करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ४४ लाख रुपये जमा केले होते. मात्र शैलेश ठाकूरने दिशाभूल करत हे ४४ लाख रुपये बँकेतून काढले आणि संपत्ती स्वतःच्या नावे केली आहे. हे पैसे त्याने उमेश यादवला परत देखील केले नाहीये.

उमेश यादवने पैश्यांची मागणी केली असता, शैलेश फरार झाला आहे. त्यामुळे उमेश यादवने टोकाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने नागपूर शहरातील कोराडी पोलीस स्थानकात धारा ४०६,४०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.