हार्दिक पांड्याचे वाढले टेंशन.. पांड्यापेक्षाही खतरनाक असलेल्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूने एका पाठोपाठ ठोकले 3 शतक, टीम इंडियातील पांड्याची जागा धोक्यात..
Tremendous performance by Vijay Shankar in Ranaji Trophy

हार्दिक पांड्याचे वाढले टेंशन.. पांड्यापेक्षाही खतरनाक अष्टपैलू खेळाडूने एका पाठोपाठ ठोकले 3 शतक, टीम इंडियातील पांड्याची जागा धोक्यात..
भारत आणि न्यूझीलंड ( IND VSNZ) यांच्यात सध्या 3 सामन्यांची एक रोमांचक एकदिवसीय मालिका आयोजित केली जात आहे. ज्याचे आयोजन टीम इंडिया करत आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवार, 18 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये खेळला गेला. ज्यामध्ये भारतीय संघाने 12 धावांनी विजय मिळवला.
पण दरम्यान अष्टपैलू हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) कामगिरी समीक्षकांच्या निशाण्यावर आली आहे कारण, तो या सामन्यात चेंडू आणि फलंदाजीसह प्रत्येक गोष्टीत फ्लॉप झाला. आणि याच दरम्यान, एका भारतीय खेळाडूने रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या जबरदस्त फलंदाजीने धुमाकूळ उडवून दिला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून सध्या रणजी ट्रॉफीमध्ये एका पाठोपाठ एक 3 शतक ठोकलेला ‘विजय शंकर’ (Vijay Shankar) आहे. विजयने रणजीच्या या हंगामात अतिशय स्फोटक फलंदाजी केली आहे.(Tremendous performance by Vijay Shankar in Ranaji Trophy)
View this post on Instagram
टीम इंडियाचा हा खेळाडू आपल्या फलंदाजीने घालतोय धुमाकूळ..
एकदिवशिय आणि टी-२० मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तामिळनाडूच्या अष्टपैलू खेळाडूने आपल्या असामान्य फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विजयला भारतीय संघातून वगळून ४ वर्षे झाली असली तरी. विशेष म्हणजे 2019 मध्ये तो भारतासाठी एकदिवसीय विश्वचषकही खेळला आहे.
विजय शंकरचे टीम इंडियात पुनरागमन होण्याची फारशी शक्यता नव्हती मात्र आता त्याने रणजी ट्रॉफीमध्ये 3 शतके झळकावून खळबळ उडवून दिली. त्यामुळे तो चर्चेत आहे. येणाऱ्या सामन्यात विजयने जर अशीच कामगिरी कायम केली तर बीसीसीआय निवड कर्त्यांना त्याला संधी द्यावीच लागू शकते आणि त्यावेळी हार्दिक पांड्याची जागा डोक्यात येऊ शकते.
3 डावात ठोकले 3 शतके!
सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना विजय शंकरने रणजीच्या शेवटच्या तीन डावांत ३ शतके झळकावली आहेत. प्रथम, त्याने आसामविरुद्ध ब गटातील सामन्यात 187 चेंडूत 112 धावा केल्या. यानंतर त्याने मुंबईविरुद्ध १०३ आणि महाराष्ट्राविरुद्ध १०७ धावांची अप्रतिम खेळी केली आहे. या शतकांमधून शंकराने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष स्वतःकडे वेधले आहे.
याशिवाय, विजय शंकरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 2019 मध्ये भारतासाठी एकूण 12 एकदिवसीय सामने आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 31.9 च्या सरासरीने 223 आणि 25.2 च्या सरासरीने 101 धावा केल्या आहेत. मात्र, त्याने एकदिवसीय सामन्यात 4 आणि टी-20 मध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…