VIRAL VIDEO: फलंदाजी मध्ये अपयशी ठरलेला ‘विराट कोहली’ क्षेत्ररक्षण करतांना लागला नाचायला, व्हिडीओ होतोय सोशल मिडीयावर तफान व्हायरल..
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूर, मध्य प्रदेश येथे खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात दहा गडी गमावून 109 धावा केल्या.
प्रत्युतरात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रो लियाने 4 गडी गमवून १५६ धावा काढल्या. ऑस्ट्रोलीयाकडे सध्या 47 धावांची आघाडी असून अजूनही 6 विकेट्स हातात आहेत.
भारतीय संघ क्षेत्ररक्षण करण्यास आल्यानंतर मैदानावर एक विलक्षन योग पहावयास मिळाला. कमी धावा केल्यामुळे भारतीय संघ आधीच दबावात होता मात्र याउलट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा मात्र मैदानावर नाचतांना दिसून आला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खराब फलंदाजी करून बाद झालेला ‘विराट कोहली’ जेव्हा क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला तेव्हा तो एका षटकात चक्क डान्स करतांना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.
पहा व्हिडीओ
https://twitter.com/GemsOfCricket/status/1630849472258510848?s=20
पहिल्या डावात भारतीय संघ ठरला अपयशी..
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार रोहित शर्माने घेतला जो ऑस्ट्रोलियाच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. त्यांनी भारतीय संघाला पहिल्या सेशन पासूनच धक्क्यावर धक्के दिले. ज्यामुळे भारतीय संघ अवघ्या 109 धावावर गारद झाला.
हे ही वाचा..
रिषभ पंतच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट! या सामन्यातून करणार कमबॅक..