“क्या कर रहा है, BC? चालू सामन्यात या कारणामुळे के एस भरत वर भडकला ‘विराट कोहली’, कोहलीचा राग पाहून भरतने घातली मान खाली, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबादमध्ये मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली उत्कृष्ट लयीत दिसत असून हळूहळू शतकाकडे वाटचाल करत आहे. कोहली जेव्हा मैदानावर असतो तेव्हा तो वेगळ्याच अंदाजात दिसतो तर कधी त्याचा रागही पाहायला मिळतो. अहमदाबाद कसोटीतही असेच दृश्य पाहायला मिळाले.
केएस भरतच्या या कृतीचा विराटला राग आला. (Virat Kohali Angry on K S Bharat)

खरंतर विराट कोहली एकेरी घेऊन धावा चोरण्यात माहीर आहे आणि त्याला धावून जास्तीत जास्त धावा करण्याचा शौक आहे. अशा स्थितीत अहमदाबाद कसोटीत रवींद्र जडेजाची विकेट पडल्यानंतर कोहलीने स्ट्राईक रोटेट करण्याचा विचार केला.
त्याने 118 व्या षटकात टॉड मर्फीच्या बॅटने संथ शॉट खेळला आणि सरळ धाव घेतली. कोहलीला पाहताच भरतही पुढे सरसावला पण नंतर मागे वळून कोहलीला अर्ध्या क्रीजवरून माघारी धाडले.
केएस भरतची ही कृती पाहून विराट कोहलीला राग आला आणि तो मागे फिरला आणि रागात काही शब्द बोलला. यानंतर केएस भरत यांनी मान झुकवून त्यांची माफी मागितली. याआधीही विराट कोहलीने अनेक खेळाडूंवर धावा काढल्याबद्दल ओरडlला आहे मात्र सामना संपल्यानंतर ते त्यालाही पटवून देतो.
पहा व्हिडीओ..
This is very shameful reaction from Virat Kohli towards youngster KS Bharat
Sad to see a youngster being Demotivated by someone's Ego💔pic.twitter.com/ygg3eDhcZl
— Immy|| 🇮🇳 (@TotallyImro45) March 12, 2023
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी केली. कांगारू संघाने पहिल्या डावात 480 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाची फलंदाजीही सुरू आहे. भारताने आतापर्यंत 4 गडी गमावून 335 धावा केल्या आहेत.
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…