VIRAL VIDEO: मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने ठोकले 2 जबरदस्त चौकार, स्ट्रेट ड्राईव्ह पाहून कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

VIRAL VIDEO:मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने ठोकला जबरदस्त चौकार, स्ट्रेट ड्राईव्ह पाहून कर्णधार रोहितशर्मा भलताच खुश, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनेही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात लग्नाची तयारी सुरू केली आहे. कोहलीसह शुभमन गिल संघाची धावसंख्या वेगाने पुढे नेत आहे. त्याने मिचेल स्टार्कला जबरदस्त फटके दिले.
कोहलीने सुंदर स्ट्रेट ड्राइव्ह मारला
विराट कोहलीने आधी स्वत:ला सेट केले, त्यानंतर त्याने हळूहळू हात खोलन्यास सुरुवात केली. मिचेल स्टार्कच्या दोन चेंडूंवर विराट कोहलीने सलग दोन सुंदर चौकार ठोकले. प्रथम, विराट कोहलीने शानदार स्ट्रेट ड्राइव्ह मारला आणि पुढच्याच चेंडूवर, त्याच्या मनगटाचा वापर करून, त्याने मागे एक शानदार शॉट खेळला. दोन चेंडूंवर दोन फटके बघून प्रेक्षकही उत्तेजित झाले. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा शॉट डगआउटमध्ये बसून पाहत होता. तो सुद्धा विराटचा हा स्ट्रेट ड्राईव पाहून खुश झाला आणि आनंदाने टाळ्या वाजवतांना दिसला.

चेतेश्वर पुजाराची विकेट पडल्यानंतर विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी भारतीय संघाचा डाव सावरला.. विराट कोहली सध्या 59 आणि रवींद्र जडेजा 16 धावा काढून नाबाद आहे. त्याआधी भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलने शानदार शतक झळकावले. शुभमन ने आपल्या या खेळीत शानदार 128 धावा काढल्या.
टीम इंडिया अजूनही ऑस्ट्रेलियाच्या स्कोअरपेक्षा 191 धावांनी मागे आहे. टीम इंडियाची धावसंख्या 3 विकेट गमावून 289 धावांवर पोहोचली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने डाव घोषित केला नाही तर कसोटी अनिर्णीत सुटू शकते. शिवाय कमीत कमी ऑस्ट्रोलियाच्या पहिला दावाइतक्या धावा तरी करण्याचे आज टीम इंडियाचे लक्ष असेल..
विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
विराट कोहलीने आतापर्यंत या मालिकेत मोठी खेळी केलेली नाही. अशा परिस्थितीत आज त्याच्या चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे विराट कोहली वनडे आणि टी-२० मध्ये फॉर्ममध्ये परतला आहे. पण कसोटीत त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
विराट कोहलीचे शानदार चौकार, नक्की पहाच.
🏏 @imVkohli 🆚 Mitchell Starc
Quality shots on display 👌👌#TeamIndia 🇮🇳 | #INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/4J9vHV9GGm
— BCCI (@BCCI) March 11, 2023
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…