भारतीय संघासाठी विराट कोहलीने खेळलेल्या ह्या 5 खेळ्या कोणताही क्रिकेटचा चाहता विसरू शकत नाही..
सचिन तेंडुलकर नंतर सचिनची उणीव भरून काढणारा खेळाडू म्हणून एकट्या विराट कोहलीकडे आपण सगळेजण पाहतो. विराट मध्ये सचिन तेंडुलकर इतक्याच क्षमता असून त्याने भारताचा स्तर आणि गुणवत्ता कायम राखून धरली. आता विराट कोहलीच्या अस्तित्वात भारतीय संघ अधिकाधिक बळकट होत चाललाय. विराट कोहली भारताचा मिडल ऑर्डर बॅट्समन आहे. तो स्ट्राइक वर असला की भारत सध्या सुरक्षित आहे असाच भाव प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतो.
कारण प्रतिस्पर्ध्यांच्या गोठातून विजयश्री खेचून आणण्याची क्षमता त्याच्यात आहे. तो ज्याप्रमाणे मोठे शॉट खेळू शकतो त्याचप्रमाणे तो जबाबदारीच्या भूमिकेत येऊन बचावात्मक खेळसुद्धा करू शकतो. विराटमध्ये अनेक कौशल्य आणि क्षमता असून त्याची खेळण्याची स्टाईल सुद्धा इतरांपेक्षा फार वेगळी आहे.
म्हणूनच आज जगातील सर्वात यशस्वी आणि पहिल्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून सर्वांनी त्याला मान्यता दिलेली आहे.
View this post on Instagram
2022 मधल्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यांमध्ये त्यानी जो कमाल केला त्यानंतर सर्वांना त्यानी थक्क करून सोडले. अनेक अनुभवी क्रिकेटर्सच्या तोंडून गौरवोद्गार आजही त्याबाबत निघत आहे. अनेक लोक विराट कोहलीची प्रशंसा करताना थकत नाही आहे. विराट सारखा विराटच असेच सगळेजण म्हणत आहे.
विराटने आजपर्यंत सर्वच स्तरात दमदार खेळाचे प्रदर्शन केले. पण त्याचे काही यादगार प्रदर्शन सुद्धा आहे. आपल्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिकेंमधील काही खास, लक्षणीय, अविस्मरणीय आणि रोमांचक इनिंग त्याने खेळलेल्या आहे. त्या इनिंग म्हणजे विराट कोहलीच्या शिरपेचात खोवलेला तुराच आहे. त्या इनिंग आपण थोडक्यात जाणून घेऊ.
2012 साली पाकिस्तान विरुद्ध भारतीय संघ खेळताना मेटाकुटीला आला होता. 181 रनाचे लक्ष चेस करताना भारतीय संघाची सुरुवातच मुळात कमकुवत झाली. विकेट जरी पडली नसली तरी युवराज सिंग आणि त्यासोबतचा सुरेश रैना यांच्या कमी गतीने खेळल्यामुळे भारतीय संघावर रनाचा प्रचंड दबाव आला. आणि मग मात्र विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या जोडीने भारताला या मॅचमधून तारले.
- विराटने यामध्ये अवघ्या ३६ चेंडूत ७५ रणाची नाबाद पारी खेळली.
View this post on Instagram
2014 साली साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध खेळताना विराटने 44 बॉलात 72 रन काढून आपल्या संघाला 172 रन चे टारगेट पूर्ण करून दिले. जणू विराट नसता तर ही मॅच भारताने गमावली असती आणि खूप मोठी नामुष्की भारतीय संघावर आली असती.
2016 हे वर्ष विराटसाठी तर एकदम दिवाळीचेच वर्ष ठरले. यामध्ये त्यानी सात-आठ अविस्मरणीय खेळ केले.यामध्ये दोन खेळ तर अतिशय रोमांचक असे होते. एकदा पाकिस्तान सोबत भिडलेला विराट अवघ्या 27 बॉल मध्ये 73 रन काढून मोकळा झाला. आणि पाकिस्तानला धूळ चालली.

याच वर्ल्ड कप मध्ये जो t20 चा वर्ल्डकप होता. त्यात ऑस्ट्रेलिया सोबत भिडताना ऑस्ट्रेलियाच्या घशात गेलेली मॅच विराटने आपल्या बॅटिंगच्या भरोशावर भारतीय संघासाठी खेचून आणली. या मॅच मध्ये अवघ्या ५० रनावर ३ विकेट्स भारताने गमावल्या होत्या. आणि 160 रनाचे टार्गेट होते. मात्र विराटने सर्व धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ऑस्ट्रेलियावर मात करून भारताचे स्थान सेमी फायनल मध्ये पक्के केले.
आणि आयसीसी 2022 च्या t20 विश्वचषक स्पर्धेतील ही पाकिस्तान विरुद्ध ची मॅच जी मेलबर्न मध्ये खेळल्या गेली ती तर सर्वांनीच पाहिली असेल. ८२ रनाची नाबाद खेळी करून विराटने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले.
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..