ICC ने जाहीर केले ODI World Cup 2023 चे वेळापत्रक, जाणून घ्या कोणत्या दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना.
क्रिकेट आपल्या देशाचा आवडता खेळ आहे. आपल्या देशात अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक जण क्रिकेट चा दिवाणा आहे. आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात परंतु क्रिकेट ला सर्वात जास्त पसंती मिळते.

क्रिकेट मधील जेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाचा सामना असतो तो सामना सर्वात रोमांचक सामना असतो. प्रत्येक भारतीय भारत आणि पाकिस्तान हा सामना पाहत असतो. तर मित्रांनो आज आम्ही या लेखात तुम्हाला यंदा होणाऱ्या वर्ल्ड कप मध्ये भारत पाकिस्तान सामने कधी खेळले जाणार याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत.
यंदा चा 2023 चा वर्ल्ड कप हा आपल्या देशात होणार आहे त्यामुळे त्याची जोरदार तयारी आपल्या देशात सुरू आहे. यंदाच्या वनडे विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामन्याची अनेक क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. पण पाकिस्तान संघाने विश्वचषकासाठी तटस्थ स्थळाची मागणी करत असल्याच्या बातम्या येत आहेत. परंतु यावर ICC ने कोणतेही उत्तर दिले नाही आणि सामन्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
यावेळी वर्ल्ड कप मध्ये जगभरातून 10 संघ सहभागी होणार आहेत. या दरम्यान वर्ल्ड कप मध्ये एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये 45 सामने आणि तीन बाद फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत. तसेच वर्ल्ड कप चा शेवटचा सामना भारतातील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. वर्ल्ड कप चे सामने हे 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत खेळवले जाणार आहेत.
सध्या अजून तरी ICC ने वेळापत्रक जाहीर केले नाही परंतु आयसीसीच्या वेळापत्रकाच्या आधारे असे समजते की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघामध्ये सामना हा ऑक्टोबर महिन्यातच खेळवला जाईल. अशा परिस्थितीत हा सामना ऑक्टोबर महिन्यातील कोणत्याही रविवारी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.