आयपीएलमुळे पुन्हा भारत गमावू शकतो जागतिक कसोटी चॅम्पियनशिप? आयपीएलनंतर भारतीय संघाला सरावासाठी फक्त एवढेच दिवस… या माजी खेळाडूने व्यक्त केली भीती..
टीम इंडियाने भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे. यासह जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीही भारतीय संघ पात्र ठरला आहे. त्याचा अंतिम सामना 9 जून 2023 रोजी ओव्हल येथे होईल.
भारताची स्पर्धा ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या जेतेपदाच्या सामन्यासाठी, जिथे ऑस्ट्रेलियाचा अर्ध्याहून अधिक संघ आधीच तयारीला सुरुवात करेल, तिथे टीम इंडियासाठी कठीण होईल कारण भारताचे सर्व खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असतील.
अशा स्थितीत दोन स्पर्धांमधील अवघ्या 9 दिवसांच्या अंतराचा भारताच्या तयारीवर कसा परिणाम होईल? याबाबत प्रशिक्षक राहुल द्रविडने मोठे वक्तव्य केले आहे.
आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल द्रविडने केले मोठे वक्तव्य..
खरे तर अहमदाबाद कसोटीनंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली होती. यामध्ये प्रशिक्षकांना आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील कमी अंतराबाबत विचारण्यात आले होते, ज्यावर द्रविडनेही चिंता व्यक्त केली असून यावर लवकरच विचार करण्यास सांगितले आहे.
द्रविडने सांगितले की, ‘आम्ही लंचच्या वेळी WTC फायनलसाठी पात्र ठरलो’. गोष्टी स्पष्ट होण्यापूर्वी मी काहीही बोलणे टाळतो. आम्ही ते साजरे करू.’ तो म्हणाला, ‘हे खूप आव्हानात्मक असेल कारण आयपीएल फायनल डब्ल्यूटीसी फायनलच्या फक्त एक आठवडा आधी आहे. त्यावर आपण विचार करू.
दबावाखाली भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली
त्याच वेळी, या चर्चेदरम्यान राहुल द्रविडने टीम इंडियाच्या खेळाडूंचेही खूप कौतुक केले आणि ते म्हणाले की- ‘जेव्हा आमच्यावर दबाव होता तेव्हा आम्ही योग्य पद्धतीने प्रतिसाद दिला. या संघाचे प्रशिक्षकपद मिळाल्याने आनंद होत आहे.मात्र, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना संघासाठी सोपा असणार नाही.
हे ही वाचा..
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…