Sports Feature

हा भारतीय फलंदाज आपल्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये एकदाही बाद झाला नव्हता, भारतला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या संघाचा होता सदस्य…

हा भारतीय फलंदाज आपल्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये एकदाही बाद झाला नव्हता, भारतला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या संघाचा होता सदस्य…


सचिनपासून विराटपर्यंत सर्वच खेळाडू अनेकवेळा शून्यावर बाद झाले होते पण आज आपण अशा खेळाडूबद्दल बोलणार आहोत जो आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही शून्यावर आऊट झाला नाही. हा खेळाडू परदेशी नसून आपल्याच भारत देशाचा असून भारताला विश्वचषक जिंकून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे.

भारताचा माजी फलंदाज यशपाल शर्मा, जो कधीही शून्यावर बाद झाला नाही. तो कधीही शून्यावर बाद न होणारा भारताचा पहिला फलंदाज आहे. 7 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या या फलंदाजाने आपल्या 42 एकदिवसीय सामन्यांच्या 40 डावांमध्ये 883 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 अर्धशतकेही झळकावली.

तर कसोटी सामन्यात त्याने 37 सामन्यांच्या 59 डावात दोन शतके आणि 9 अर्धशतकांसह 1606 धावा केल्या. एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्याला कोणीही शून्यावर बाद करू शकले नाही.

विश्वचषकात महत्त्वाचे योगदान.

1983 च्या विश्वचषकात भारताच्या विजयात यशपाल शर्माचा मोलाचा वाटा होता. यशपालने या स्पर्धेत 240 धावा केल्या. या खेळाडूने खेळलेल्या खेळीमुळे भारतीय क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला. यशपाल शर्माने 1983 च्या विश्वचषकात भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर हा काळ त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा सुवर्णकाळ होता.

फलंदाज

भारतीय क्रिकेट संघाकडून आतापर्यंत अनेक खेळाडूंनी क्रिकेट खेळले आहे आणि देशाचे प्रतिनिधित्व केलं मात्र यशपाल सारखा संपूर्ण कारकिर्दीत कधीही बाद न होण्याचा विक्रम दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला करता आला  नाही. आजही हा विक्रम संपूर्ण जगभरातील खेळाडू मिळून सुद्धा मोडू शकले नाहीयेत.

1983 च्या वर्ल्डकप संघाचा सदस्य असलेला यशपाल शर्मा हा भारतीय संघाचा चांगला खेळाडू होता. वर्ल्डकप जिंकण्यात त्याचा सुद्धा महत्वाचा हात होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button