T-20 मध्ये महाविक्रम करण्यापासून केवळ १ विकेट दूर आहे यजुवेंद्र चहल,न्यूझीलंड विरुद्ध एक विकेट घेताच अशी कामगिरी करणारा ठरू शकतो पहिला भारतीय गोलंदाज..
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रांची येथे पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. लेगस्पिनर युझवेंद्र चहलला या सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे. उद्या म्हणजेच 27 जानेवारीला पहिला T20 सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. या सामन्यात युझवेंद्र चहलला खेळण्याची संधी मिळाली तर तो एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात 1 विकेट घेतल्यास तो भारतासाठी या फॉरमॅटमधील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरेल. यासह तो टीम इंडियाच्या अनेक दिग्गजांना मागे सोडणार आहे.
View this post on Instagram
चहल भुवनेश्वरला मागे टाकू शकतो!
सध्या, टीम इंडियासाठी T20 मध्ये सर्वात यशस्वी गोलंदाज भुवनेश्वर कुमार आहे, ज्याने एकूण 90 विकेट घेतल्या आहेत, तर युजवेंद्र चहलच्या नावावर देखील T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 90 विकेट आहेत. 1 विकेट घेताच तो बी कुमारला मागे सोडेल.
चहल हा मोठा विक्रम करू शकतो!
एवढेच नाही तर चहलने 2 विकेट्स मिळविल्या तर सर्व T20 सामन्यांसह भारतासाठी T20 मध्ये 300 बळी घेणारा पहिला भारतीय देखील बनू शकतो. त्याने आतापर्यंत 263 टी-20 सामन्यात एकूण 298 विकेट घेतल्या आहेत.

टीम इंडियासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
युझवेंद्र चहल – ९०
भुवनेश्वर कुमार – ९०
आर अश्विन – ७२
जसप्रीत बुमराह – ७०
हार्दिक पांड्या – 64
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
टीम साउथी – 134
शाकिब अल हसन – १२८
राशिद खान – १२२
ईश सोडी-111
लसिथ मलिंगा – 107
हे ही वाचा..
पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटपटू स्वतःला म्हणतोय विराट कोहली पेक्षा श्रेष्ठ..
हृदयद्रावक घटना!गोलंदाजी करत असताना ३२ वर्षीय तरुणाने गमावला जीव