खोट वाटेल भावा,पण विश्वास ठेव.. या मंदिरात चक्क 200 वर्षापासून एका चेटकीणीची पूजा केली जातेय…
भारत हा देवतांची भूमी असल्यामुळे भारतात देवी देवतांची अनेक मंदिरे आहेत . येथे सर्व प्रकारच्या दैवी शक्तीची पूजा केली जाते. पण आज आपण ज्या मंदिराबद्दल बोलणार आहोत, तिथे कोणत्याही देवतेची पूजा केली जात नाही. हे खरंच थोडं विचित्र वाटतं. होय, पण हे खरे आहे की आपल्या देशातही अनोखी मंदिरे आहेत. उदाहरणार्थ, छत्तीसगडमधील हे प्राचीन मंदिर घ्या, जिथे कोणत्याही देवतेची पूजा केली जात नाही, तर ‘एका चेटकीनिची पूजा केली जाते.
हेही वाचा:जन्माने जरी राजपुत्र नसले तरीही, कर्माने मात्र शाहू महाराज शिवाजी महाराजांचे वंशजचं होते..
छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात ‘झिंका’ नावाचे एक गाव आहे. येथील रस्त्याला लागून चेटकिन देवीचे मंदिर आहे. हे मंदिर 200 वर्षे जुने असल्याचे मानले जाते. हे मंदिर पूर्वी कडुलिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या व्यासपीठावर असल्याचे ग्रामस्थ सांगतात. कालांतराने लोकांना या मंदिराची माहिती झाली आणि नंतर लोकांनी पैसे गोळा करून, चेटकीण देवीचे मोठे मंदिर बांधले.
मंदिरात एक मूर्ती स्थापित केली आहे, जी छत्तीसगढ बोलीभाषेत ‘परेटिन दाई’ (डायन आई) या नावाने ओळखली जाते. असे मानले जाते की या मंदिराच्या पुढे कोणीही डोके टेकवल्याशिवाय जाऊ शकत नाही. जर कोणी असे केले तर त्याला पुढील मार्गात अडचण येईल. मात्र, जर कोणाला या मंदिराची माहिती नसेल तर त्याला काही त्रास होत नाही. मात्र, असे स्थानिक लोकांचे मत आहे.
महामार्गाला लागुनच असलेल्या या मंदिरातून कोणतेही मालाचे वाहन देणगी दिल्याशिवाय जात नाही, असे सांगितले जाते. कारण, त्यांना पुढे अपघात होण्याची भीती असते. या मंदिरात लोक मोठ्या प्रमाणात विटा अर्पण करतात. सहसा या मार्गावरून जास्त करू विटा वाहून नेणारी वाहने बाहेर पडतात, त्यामुळे ते आधी मंदिरात देणगी अर्पण करातात. मंदिरात एवढ्या मोठ्या प्रमाणात विटा अर्पण केल्या जातात की गावातील इतर विकासकामे अर्पण केलेल्या विटांनी केली जातात, जसे की मचाण, नाली बांधणे. तसेच या मंदिराच्या विकासकामासाठी येणारा-जाणारा प्रत्येक व्यक्ती काही ना काही देत असतो.

अशा स्थितीत जो काही माल वाहनात भरला जातो, तो काही ना काही देऊ केला जातो. मग ती वीट असो की दगड, गवत, माती, भाजी किंवा आणखी काही. अनेक दूधवाले आजूबाजूच्या परिसरात दूध विक्रीसाठी जातात, असेही सांगितले जाते. त्यांनी इथे आधी दूध दिले नाही तर ते दूध दही होते. अशाच विश्वासाने लोक वर्षानुवर्षे ‘चेटकीण’ मातेची पूजा करत आहेत.
चेटकीण आई ही या गावकऱ्यांसाठी नकारात्मक शक्ती नाही. ते तिची परातिन देवीप्रमाणे पूजा करतात. ते म्हणतात की आई कधीच कोणाला त्रास देत नाही. जो कोणी तिची खऱ्या मनाने प्रार्थना करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. गावातील व परिसरातील लोक या मंदिराला खूप मानतात. दोन्ही नवरात्रीमध्ये मोठ्या संख्येने भाविक मंदिरात ज्योतीकलश लावतात.
हेही वाचा:
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..