विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाला आता सेमी फायनल मध्ये पोहोचणे अवघड झाले आहे. चेन्नईच्या चिपक मैदानावर पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिका यांच्यात एक रोमांच सामना झाला ज्यात पाकिस्तानचा पराभव झाला. त्यामुळे त्यांना सेमी फायनल मध्ये अशक्य झाले आहे. हा सामना जिंकण्यासाठी पाकने जीव तोडून मेहनत केली, पण अखेर दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. ये पराभवानंतर सोशल मीडियावर शाहीन शहा आफ्रिदीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो धाय मोकलून रडत आहे.
विश्वचषक 2023 मधला पाकिस्तानचा प्रवास खूपच निराशा जनक झाला आहे. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर ते मानसिक दृष्ट्या खचून गेले आहेत. सेमी फायनल मध्ये पोहोचण्याचे त्यांचे सर्व रस्ते बंद झाले आहेत. करा अथवा मरा अशा स्थितीत असलेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला जिंकणे फार महत्त्वाचे होते. मात्र बाबर अँड कंपनीचा पराभव झाला. पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू खूप भावूक झाले आहेत. याच दरम्यान शाहीन शाह आफ्रिदी पराभवानंतर खूप रडत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर भारतीय चाहते या पाकिस्तानी खेळाडूचे सांत्वन करीत आहेत.
पाकिस्तान संघ अजूनही ऑफिशिअली सेमी फायनलच्या रेस मधून बाहेर नाही. परंतु टॉप चार मध्ये पोहोचणे हे जवळपास असंभव आहे. सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक संघाला सहा सामने जिंकावी लागणार आहेत. पण पाकिस्तानी सहापैकी केवळ दोनच सामन्यात विजय मिळवला आहे तर सलग चार सामन्यात पराभव झाला आहे. पाकिस्तानाला सेमी फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना प्रत्येक सामना हा मोठ्या अंतराने जिंकावा लागेल तसेच इतर संघाच्या पराभवासाठी प्रार्थना देखील करावी लागेल. पाकिस्तानने जर दहा गुण मिळवले तर सेमी फायनल मध्ये तो संघ कसा-बसा पोहोचू शकतो.
पाकिस्तानचा संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणांमध्ये सुमार कामगिरी केली आहे. त्याचाच फटका म्हणून त्यांना सलग चार सामन्यात पराभवातला सामोरे जावे लागले. पराभवानंतर बाबरच्या नेतृत्वावर देखील मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. मैदानात उतरल्यानंतर बाबर सतत त्याच्या खेळाडूंवर चिडत असल्याचे दिसून येत होता. संघातील खेळाडू आणि कर्णधारांमध्ये कोणताच ताळमेळ दिसत नव्हता.