कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर शनिवारी बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात नेदरलँडच्या संघाने बांगलादेशचा 87 धावांनी पराभव केला. या विजयासह नेदरलँडने सहा सामन्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवण्यात यश मिळवले. सांघिक खेळाच्या जोरावर नेदरलँड या दोन्ही सामन्यात विजय मिळवला. या संघाने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी करून दाखवली आहे. नेदरलँडच्या या विजयात सर्वात मोठे योगदान दिले ते म्हणजे कर्णधार स्कॉट एडवर्ड्स यांचे. त्याच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेदरलँड आणि बांगलादेश यांचा सामना पाहण्यासाठी महिला प्रेक्षकांचे जास्त गर्दी दिसून आली. सामना जिंकल्यानंतर कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नेदरलँडच्या प्रेक्षकांसोबत हस्तांदोलन केले. त्यातच एक महिला पुढे येत स्कॉटशी हस्तांदोलन केले. व ती त्याच्यासोबत बोलण्याचा बहाणा करून जवळ येत त्याला किस करण्याचा प्रयत्न केला, पण स्कॉटने प्रसंगावधान दाखवत पाठीमागे सरकले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नेदरलँड संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 10 गडी गमावून 229 धावा केल्या. कर्णधार एडवर्ड्सने सर्वाधिक 68 धावा केल्या. त्याने 89 चेंडूंचा सामना केल्यानंतर 76 च्या स्ट्राईक रेटने खेळताना 6 चौकारही मारले. लक्ष्याचा पाठलाग करताना शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली बांगलादेशचा संघ 43 व्या षटकातच ऑलआऊट झाला. मेहदी हसनने सर्वाधिक 35 धावांचे योगदान दिले.
यापूर्वी नेदरलँडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा पराभव करत विश्वचषक स्पर्धेत सर्वात मोठा उलटफेअर केला होता.