चक्क AI ने बनवली इंडियन्सची टीम, पण मुंबई इंडियन्सच्या ऑलटाइम IPL प्लेइंग 11 मध्ये भारताचा कॅप्टन नाही! 

0
25
ad

 

 

मुंबई इंडियन्स ही इंडियन प्रीमियर लीगमधली दुसरी सगळ्यात यशस्वी टीम मानली जाते. या टीमसाठी अनेक खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे, आणि त्यामागे अनेक खेळाडूंचा हात आहे. मेटा एआयने मुंबई इंडियन्सची ऑलटाइम प्लेइंग 11 निवडली आहे, पण आश्चर्य म्हणजे यात भारताचा टी20 कॅप्टन सूर्यकुमार यादवलाच जागा मिळाली नाही.

 

रोहित आणि सचिन करतील ओपनिंग

एआयने मुंबई इंडियन्सच्या टीमचा कॅप्टन रोहित शर्माला बनवलं आहे, जो टीमला 5 वेळा विजेतेपद मिळवून दिलंय. त्याच्यासोबत ओपनिंगसाठी सचिन तेंडुलकरला निवडलं आहे.

images 16

रायडू आणि सौरभ तिवारी मिडल ऑर्डरमध्ये

एआयने मिडल ऑर्डरची जबाबदारी अंबाती रायडू आणि सौरभ तिवारीवर सोपवली आहे. दोन्ही खेळाडूंनी मिडल ऑर्डरमध्ये चांगलं योगदान दिलं आहे.

 

हे ही वाचा:- भारतीय क्रिकेटर वापरतात एवढ्या महागड्या बॅट, किंमत ऐकून विश्वास बसणार नाही.

 

 

 

हार्दिक आणि पोलार्ड फिनिशर

फिनिशरच्या भूमिकेत हार्दिक पांड्या आणि किरोन पोलार्डला जबाबदारी देण्यात आली आहे. हे दोघेही मुंबई इंडियन्ससाठी मॅच विनर राहिले आहेत. हार्दिक तर सध्या टीमचा कॅप्टन आहे.

 

कृणाल आणि हरभजन यांच्याकडे स्पिनची कमान:-

एआयने मुंबई इंडियन्सच्या स्पिन विभागासाठी कृणाल पांड्या आणि हरभजन सिंग यांना निवडलं आहे. हे दोघेही बॅटने देखील योगदान देऊ शकतात.

 

Untitled design 10

 

जबरदस्त फास्ट बॉलिंग

मुंबई इंडियन्सच्या फास्ट बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा आणि मिचेल मॅकलेगन या तिघांची जोडी निवडली गेली आहे. या तिघांनी टीमसाठी बऱ्याच विकेट्स घेतल्या आहेत.

 

हे ही वाचा:- IPL 2025 Auction : मुंबई इंडियन्सला संघाला चा 440 झटका; जसप्रीत बुमराह चा मुंबई इंडियन्स संघात न खेळण्याचा निर्णय, जाणून घ्या सविस्तर.