दिल्लीच्या मैदानावर गोंगावले ग्लेन मॅक्सवेल नावाचे वादळ; 40 चेंडूत ठोकले विक्रमी शतक

0

नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर ग्लेन मॅक्सवेल नावाचे तुफान क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळाले. मॅक्सवेलने आक्रमक स्वरूपात फलंदाजी करत वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकले. त्याने विस्फोटक खेळी करत केवळ 40 चेंडूत शतक पूर्ण केले. या शतकासह ग्लेन मॅक्सवेलने ऍडम मारक्रमचा विक्रम देखील मोडीत काढला.

मधल्या फळीतील फलंदाज मार्रनस लाबुशेन आऊट झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास मॅक्सवेल मैदानात आला. मैदानात उतरताच त्याने चौकार षटकाराची आतिषबाजी करण्यास सुरुवात केली. या कांगारू फलंदाजांने विस्फोटिक खेळी करत अवघ्या 27 चेंडूत सुरुवातीला अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मॅक्सवेलने अधिक वेगाने शतकाच्या दिशेने वाटचाल करत अवघ्या 13 चेंडूत 50 धावा काढत शतक पूर्ण केले.

त्याच्या स्फोटक खेळी पुढे नेदरलँडचे गोलंदाज हे हाताश आणि निराश दिसून आले. त्याने प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला. नेदरलँडच्या गोलंदाजांनी टाकलेल्या चेंडूला त्याने केवळ चौकार आणि षटकारानेच उत्तर दिले.

ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज फलंदाजाने केवळ 44 चेंडूत 106 धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 8 उत्तुंग षटकार ठोकले. मॅक्सवेलने केवळ 84 धावा चौकार अन षटकार ठोकून काढले. त्याच्या या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 8 बाद 399 धावा काढल्या.

मॅक्सवेलने या खेळीसह विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत शतक ठोकणारा ऍडम मारर्क्रमचा विक्रम देखील पाठीमागे टाकला. मारर्क्रमने याच विश्वचषक स्पर्धेत श्रीलंके विरुद्ध खेळताना केवळ 49 चेंडूत सेंचुरी पूर्ण केली होती. त्याआधी 2011 मध्ये आयर्लंडचा फलंदाज केविन ओ ब्रायन याने केवळ 50 चेंडूत शतक पूर्ण करून दाखवले होते. यापूर्वी मॅक्सवेलने 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत केवळ 51 चेंडूत शतक ठोकले होते.

ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स या जोडीने सातव्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी रचली. विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया कडून सातव्या विकेटसाठी रचलेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. यासह त्यांनी स्टीव्ह स्मिथ आणि नाथन कुलटर नाईन यांचा देखील विक्रम मोडीत काढला. या दोघांनी 2019 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत विंडीज विरुद्ध खेळताना सातव्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी रचली होती.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर  तीन विजयासह त्यांचे एकूण सहा गुण होतील. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ हा पाचव्या स्थानावर आहे. सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला कोणत्याही परिस्थितीत पुढचे सर्वसामान्य जिंकावे लागणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.