IPL 2025: यंदा च्या सिझन मध्ये ठरणार हा सर्वात महागडा खेळाडू, हरभजन सिंग ने केली भविष्यवाणी

0
20
ad

 

येत्या काही दिवसातच देशात आयपीएल च्या नवीन पर्वाला सुरुवात होईल. देशातील क्रिकेटप्रेमी आयपीएल ची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत आयपीएल च्या आधी ऑक्शन ला सुरुवात होईल अंदाज ऑक्शन हे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला होणार असल्याची माहिती BCCI ने दिली आहे. तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला या लेखात ऑक्शन मध्ये सर्वात महागडा खेळाडू कोण ठरू शकतो याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

 

Untitled design 8

आयपीएल ऑक्शन मध्ये प्रत्येक खेळाडूंची बोली लागली जाते यामध्ये भारतीय तसेच परदेशी खेळाडूंचा सुद्धा समावेश असतो. ही बोली करोडो रुपयांची असते तर जाणून घेऊया.

 

सर्वात महागडा खेळाडू:-

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू हा मिचेल स्टार्क आहे, ज्याला गेल्या लिलावात केकेआर या संघाने तब्बल 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यामुळे आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून याची नोंद झाली आहे.

 

अनेक मोठे खेळाडू आयपीएल 2025 च्या लिलावात सहभागी होऊ शकतात:-

यंदा च्या वर्षी काही खेळाडूंना रीटेन करायचं आहे त्यामुळे प्रत्येक संघात मोठा बदल झालेला दिसून येणार आहे कारण प्रत्येक संघातील खेळाडूंना अन्य संघात खेळावे लागणार आहे. त्यामुळे ऑक्शन मध्ये सुद्धा खेळाडूंना मोठी बोली लागणार असल्याचे हरभजन सिंग ने सांगितले आहे.

images 13

 

 

 

 हरभजन सिंग ची भविष्यवाणी:-

 

हरभजन सिंगच्या मते, जर बुमराह लिलावात आला तर तो ऑक्शन चे सर्व रेकॉर्ड मोडू शकतो. तसेच हरभजन सिंग ने त्याच्या ट्विटर अकाऊंट वर ट्विट सुद्धा केले आहे की, ‘जर बुमराह लिलावात आला तर तो सर्वात महागडा खेळाडू होईल का?

 

हे ही वाचा:- भारतीय क्रिकेटर वापरतात एवढ्या महागड्या बॅट, किंमत ऐकून विश्वास बसणार नाही.

 

 

 

 

 

मुंबई इंडियन्स ची अवस्था:-

आयपीएल 2025 च्या लिलावात मुंबई इंडियन्ससमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे रिटेन्शन मनी, कोणत्या खेळाडूला संघात राखून ठेवायचे हा आहे आणि त्यासाठी किती पैसे मोजावे लागणार. त्यांनी सर्व बड्या खेळाडूंना चांगल्या किमतीत कायम ठेवले पाहिजे.अशा स्थितीत बुमराह, रोहित हार्दिक आणि सूर्या यापैकी कोणता खेळाडू ११, १४ आणि १८ कोटींमध्ये राहणार का याबाबत मोठा पेच निर्माण होऊ शकतो.

 

 

 

बुमराहचा आयपीएलमधील उत्कृष्ट विक्रम:-

जसप्रीत बुमराह आतापर्यंत आयपीएलमध्ये फक्त एकाच संघाकडून खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये 133 सामने खेळले असून त्यात त्याने 165 विकेट घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्स संघाचा अतिशय दर्जेदार खेळाडू असल्यामुळे मुंबई इंडियन्स संघ बुमराह ला कोणत्याही किमतीमध्ये खरेदी करेल.

 

 

 

हे ही वाचा:- IPL 2025 Auction : मुंबई इंडियन्सला संघाला चा 440 झटका; जसप्रीत बुमराह चा मुंबई इंडियन्स संघात न खेळण्याचा निर्णय, जाणून घ्या सविस्तर.