INDIA vs NEW ZEALAND: पहिल्या सेमीफायनल सामन्यात विराट कोहली करू शकतो महाविक्रम, सचिन तेंडूलकरचे हे 2 विक्रम मोडणार?

0
3

INDIA vs NEW ZEALAND: विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड आणि भारत यांच्यात होणार आहे. या सामन्यावर जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहणार आहे. टीम इंडियाचे रन मशिन विराट कोहलीची बॅट या टूर्नामेंटमध्ये सतत चर्चेत आहे. कोहलीने 2 शतके झळकावली आहेत. उपांत्य फेरीच्या सामन्यात कोहलीला दोन मोठे विश्वविक्रम करण्याची मोठी संधी असेल.

INDIA vs NEW ZEALAND: भारत 2019 चा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार.

टीम इंडियाने साखळी सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून विश्वचषकातील 20 वर्षांचा प्रदीर्घ पराभवाची मालिका खंडित केली. आता उपांत्य फेरीच्या सामन्यात 2019 चाबदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.. 2019 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा पराभव करून न्यूझीलंडचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले. त्यावेळी संघाचे कर्णधारपद विराट कोहलीच्या हातात होते.

IND vs NZ 

आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे. यजमान भारत 2023 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सलग 9 सामने जिंकून अपराजित राहिला आहे. आता सेमीफायनल आणि फायनल असे दोन विजय भारताला विश्वविजेता बनवू शकतात.

INDIA vs NEW ZEALAND: न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली तोडू शकतो मोठे विक्रम.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावून विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या वनडेतील सर्वोच्च 49 शतकांची बरोबरी केली होती. आता त्याला सचिनचा हा विक्रम  तोडण्याची मोठी संधी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावून कोहली वनडेत सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रम करू शकतो. कोहली या स्पर्धेत अतिशय घातक फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंतच्या मोसमात सर्वाधिक ५९४ धावा करणारा तो फलंदाज आहे. त्याने आपल्या बॅटने 2 शतके झळकावली आहेत. कोहलीला सचिनचा आणखी एक मोठा विक्रम मोडण्याची संधी असेल.

IND vs NZ ODI World Cup Semifinal

विराट कोहली सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वविक्रम आपल्या नावावर करू शकतो. विश्वचषक २०२३ मध्ये कोहलीने आतापर्यंत ९ सामन्यांत ५९४ धावा केल्या आहेत. विश्वचषकाच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याच्या तो खूप जवळ आहे. हा विक्रम सचिन तेंडुलकर (673 धावा) च्या नावावर आहे जो 2003 च्या विश्वचषकात बनला होता. यासाठी कोहलीला फक्त 80 धावांची गरज आहे. 80 धावा करताच तो विश्वचषकाच्या इतिहासात एकाच सत्रात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने 2019 च्या विश्वचषकात 5 शतकांसह 648 धावा केल्या होत्या.

INDIA vs NEW ZEALAND

आता उद्या होणाऱ्या सामन्यात विराट कोहली कशी कामगिरी करतो आणि सचिन तेंडूलकरचे हे विक्रम मोडू शकतो का नाही? हे पाहणे रंजक ठरणार आहे. एकंदरीत दोन्ही संघातील खेळाडूंचा फोर्म पाहता  जगातील क्रिकेट रसिकांना उद्या एक जबरदस्त मुकाबला पाहायला मिळणार, यात शंका नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here